खानापूर तालुक्यातील मंदिरे

खानापूर तालूक्यात पंधराहून अधिक रमणीय पर्यटन ठिकाणे आहेत.एक दिवसाची चांगली सहल या स्थळांना भेट देण्यासाठी होऊ शकते. रेवणसिध्द, मूळ स्थान गायमुख, दर्गोबा, वेताळगुरूदेव, जगलोबा, जोगिंदरबुवा, भीमाशंकर, शुकाचार्य, बाणूरगड, सुळकाई, राजुबुवाची समाधी यांचा त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल.काही ठिकाणी हिरवीगार झाडी, काही ठिकाणी विलोभनीय निसर्गसौदर्य यांमुळे पर्यटक आकर्षित होत आहेत. सुळकाई मंदीर :विटे शहराच्या ईशान्स सुळेवाडीच्या

कवठेमहांकाळची महांकाली

कवठेमहांकाळ येथे श्री महांकाली देवीचे मंदीर आहे.त्यामुळे गावाला कवठेमहांकाळ असे नाव पडले आहे.श्री महांकालीदेवीचा नवरात्र उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. आश्विन शुध्द प्रतिपदा ते शुध्द दशमी (दसरा)असा देवीचा उत्सव साजरा केला जातो.या काळात गामिण भागातून भाविक येतात. दसर्‍या दिवसी शोभेच्या दारूची आताषवाजी,लेझीम,ढोल,दांडपट्टा दूध वाटप, टिपर्‍या डान्स असे विविध कार्यक्रम रात्रभर चालू असतात. विठ्ठल मंदीर

गोरक्षनाथांचे मंदिर

शिराळ्यात पंढरीच्या विठुरायाऎवढेच गोरक्षनाथ मंदीरास महत्व आहे.एकादशीला सांगली,कोल्हापूर,सातारा जिल्ह्याती भाविक येथे दर्शनासाठी येतात.येथे जगप्रसिध्द नांगपंचमीची सुरूवात ही गोरक्षनाथानीच केली.हनुमान जयंतीनंतर येणार्‍या एकादशी पासून चैत्र कृष्ण ११ पासून यात्रेस सुरवात होते.त्याचा कालावधी आठ दिवसाचा असतो.या काळात राज्याच्या विविध भागातून अनेक वारकरी येतात. मंदिरामागे तोरण मोरण नदीचा संगम आहे.दर बारा वर्षानी कुंभमेळ्यानंतर झुडीने नाथाचे पाईक येतात.दक्षिणाभिमुख मारूती,विठ्ठ्ल

श्री बनशंकरीचे देवस्थान

जत तालुक्यातील ठिकाणापासून उत्तरेल १२ किलोमीटर पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे.गावाशेजारील छोटया डोंगराच्या कुशीत हिरवेगार घनदाट बन आहे.या गर्द वनराईत श्री बनशंकरीचे देवस्थान आहे.कायम दुष्काळी गावात बसलेले हे ठिकाण वाळ्वंटातील ओअ‍ॅसिसप्रमाणे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. चारी बाजूला छोटया टेकडया, मधोमध लहानशी दरी. दरी मध्ये आंबा, चिंच, जांभूळ, पिंपळ, वड, नीलगिरी, सीताफळ व रामफळाचे उंचच उंच

वाळवे तालुक्यातील मंदिर

वाळवे तालुक्यातील मंदिरे रमणीय व प्रेक्षणीय आहेत .भाविकांसाठी व प्रेक्षणीय स्थळांना भेटी म्हणून ही मंदिरे महत्त्वपूर्ण आहेत. श्री नरसिंह मंदिर नरसिंहपूर :येथील स्वयंभू श्री नरसिंह मंदिर परिसरातील भाविकाचे श्रध्दास्थान आहे.इस्लामपूर शहरापासून पंधरा किलोमीटर वर नरसिंहपूर हे आहे.तेराव्या शतकातील हे हेमाडपंथी बांधकामाचे हे पुरातन मंदिर आहे.या मंदीराचे वैशिष्टय म्हणजे प्रथम या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापाना करण्यात आली

ऐतिहासिक विहीर,मिरज

मिरज येथे आदिलशहाच्या काळातील हैदरखान नावाच्या सरदाराने ७५० वर्षापूर्वी १५० बाय १५० फूट आकाराची व ६० फूट खोल अशी विहीर बांधली आहे. मिरजेतील रेल्वेस्थानकात असलेल्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीतून सात वर्षांपूर्वी दुष्काळात लातूरकरांचीही तहान भागविण्यात आली होती. मात्र, आता विहिरीचा वापर नसल्याने विहिरीचे डबके झाले आहे. या विहिरीचे पुनरुज्जीवन करून ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी होत

सर वानलेस मिशन हॉस्पिटल

मिरज हे वैद्यकीय दृष्ट्या जगप्रसिध्द शहर आहे. सर विल्यम वानलेस हॉस्पिटल हे सन १८९४ मध्ये सर विल्यम यांनी स्थापन केले. मिशनरी वृत्तीने या हॉस्पिटलमध्ये रूग्णांची सेवा केली जाते.

बत्तीस शिराळा नागपंचमी उत्सव

शिराळा हे सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर असलेले तालुक्याचे गाव आहे. येथे ऎतिहासिक, सास्कृतिक मोठी परंपरा आहे.पण शिराळ्याचे नाव सर्व दूर गेले ते नागपंचमी उत्सवा मुळे.महायोगी गोरक्षनाथांनी सुरू केलेल्या या नाग उत्सवाला सुमारे हजार वर्षाची पंरपरा आहे.पूर्वी येथे कोतवाल घराण्यातील मंडळी नाग पकडत होती. नागपंचमी दिवशी मातीच्या व कोतवालांनी पकडलेल्या जिवंत नागाची पूजा आज ही येथील

तासगाव तालुक्यातील पेड

तासगाव तालुक्यातील पेड नैसर्गिक देणगी लाभलेले गाव आहे. निळ्याशार पाण्याचा तलाव, समृध्द वनराई व इतिहासाची साक्ष देणारे वाडे पर्यटकांना आकर्षित करतात डोंगरदर्‍यात वसलेल्या गावात पेशव्यांचा तळ होता.गावाच्या आसपासच्या डोंगर माथ्यावरून दृष्टीक्षेप टाकला तर गावातील सुपीक जमीन,पाण्याने भरलेला तलाव मन मोहून टाकतो.वनीकरण या विभागाच्या परिश्रमामुळे या तलावाच्या बाजूला हिरवीगार जंगलझाडी वाढली आहे. या ठिकाणी शिरस बाभूळ,

भिलवडीचे दगडी घाट

भिलवडी येथील कृष्णा दगडी घाट वास्तुशिल्पाचा वैशिष्ठ्यपूर्ण नमुना आहे.कृष्णेच्या उगमापासून असा घाट आढळत नसल्याचा उल्लेख केला जातो.घाटाचा इतिहास मोठा रंजक आहे.इसवी सन १७७९ मध्ये मराठा सलतनीचे सरदार श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन यांनी बांधला.परशुरामभाऊंचा मुस्लिम सरदाराकडून १६९४ मध्ये पराभव झाला.या घाटाची लांबी सव्वा चारशे फूट आहे.एकशे दोन फूट रूंदी आहे दोन्ही बाजूला चार फूट व्यासाचे चौदा

Translate »