ऐतिहासिक विहीर,मिरज

मिरज येथे आदिलशहाच्या काळातील हैदरखान नावाच्या सरदाराने ७५० वर्षापूर्वी १५० बाय १५० फूट आकाराची व ६० फूट खोल अशी विहीर बांधली आहे. मिरजेतील रेल्वेस्थानकात असलेल्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीतून सात वर्षांपूर्वी दुष्काळात लातूरकरांचीही तहान भागविण्यात आली होती. मात्र, आता विहिरीचा वापर नसल्याने विहिरीचे डबके झाले आहे. या विहिरीचे पुनरुज्जीवन करून ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी होत

सर वानलेस मिशन हॉस्पिटल

मिरज हे वैद्यकीय दृष्ट्या जगप्रसिध्द शहर आहे. सर विल्यम वानलेस हॉस्पिटल हे सन १८९४ मध्ये सर विल्यम यांनी स्थापन केले. मिशनरी वृत्तीने या हॉस्पिटलमध्ये रूग्णांची सेवा केली जाते.

बत्तीस शिराळा नागपंचमी उत्सव

शिराळा हे सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर असलेले तालुक्याचे गाव आहे. येथे ऎतिहासिक, सास्कृतिक मोठी परंपरा आहे.पण शिराळ्याचे नाव सर्व दूर गेले ते नागपंचमी उत्सवा मुळे.महायोगी गोरक्षनाथांनी सुरू केलेल्या या नाग उत्सवाला सुमारे हजार वर्षाची पंरपरा आहे.पूर्वी येथे कोतवाल घराण्यातील मंडळी नाग पकडत होती. नागपंचमी दिवशी मातीच्या व कोतवालांनी पकडलेल्या जिवंत नागाची पूजा आज ही येथील

तासगाव तालुक्यातील पेड

तासगाव तालुक्यातील पेड नैसर्गिक देणगी लाभलेले गाव आहे. निळ्याशार पाण्याचा तलाव, समृध्द वनराई व इतिहासाची साक्ष देणारे वाडे पर्यटकांना आकर्षित करतात डोंगरदर्‍यात वसलेल्या गावात पेशव्यांचा तळ होता.गावाच्या आसपासच्या डोंगर माथ्यावरून दृष्टीक्षेप टाकला तर गावातील सुपीक जमीन,पाण्याने भरलेला तलाव मन मोहून टाकतो.वनीकरण या विभागाच्या परिश्रमामुळे या तलावाच्या बाजूला हिरवीगार जंगलझाडी वाढली आहे. या ठिकाणी शिरस बाभूळ,

भिलवडीचे दगडी घाट

भिलवडी येथील कृष्णा दगडी घाट वास्तुशिल्पाचा वैशिष्ठ्यपूर्ण नमुना आहे.कृष्णेच्या उगमापासून असा घाट आढळत नसल्याचा उल्लेख केला जातो.घाटाचा इतिहास मोठा रंजक आहे.इसवी सन १७७९ मध्ये मराठा सलतनीचे सरदार श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन यांनी बांधला.परशुरामभाऊंचा मुस्लिम सरदाराकडून १६९४ मध्ये पराभव झाला.या घाटाची लांबी सव्वा चारशे फूट आहे.एकशे दोन फूट रूंदी आहे दोन्ही बाजूला चार फूट व्यासाचे चौदा

बाणूरगड किल्ला

शिवकालीन इतिहसाचा साक्षीदार म्हणून गणल्या गेलेल्या शिवछ्त्रपतीचे सच्चे सेवक बहिजी नाईक यांची समाधी आहे.खानापुर तालुक्यात रेवागिरी डोंगरातून फिरताना सहलीच्या आंनदाची एक वेगळीच पर्वणी मिळ्ते रेवागिरी डोंगररंगएच्या पूर्व टोकावर बाणूरगड हे गाव आहे.बाणूरगडचा किल्ला भूपाल राजाने बांधला अदिलशहाकडून हा किल्ला शिवाजीमहाराजानी जिंकून घेतला.दगडी कमानी कोरून केलेल्या बारा वाटा येथे आहेत.त्यातून वाकून जावे लागते.समुद्र सपाटीपासून साडेतीन फूट

चांदोली धरण

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेले अशिया खंडातील क्रमांक दोनचे मातीचे धरण म्हणून चांदोली धरणाचे नाव चटकन डोळ्या पुढे येते.सुमारे ३४ टी एम.सी.पाणीसाठा असलेले व चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या तोंडाशी असलेले हे धरण निर्मिती पासूनच चर्चेत राहिले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पाथरपुंज येथे वारणा नदी उगम पावली आहे.शिराळा तालुक्याच्या हद्दीत अभयारण्यात असलेल्या प्रचीतगडाच्या पायथ्याशी राम नदीचा उगम आहे. या दोन

नांद्रयाचा प्रसिध्द दर्गा

मिरज तालुक्यातील नांद्रे येथे प्रसिध्द ख्वॉजा कबीरली दर्गा राज्यात प्रसिध्द आहे.ख्वॉजा कबीर बंधू अरबस्तानातून गुलबर्गा, कुडची मिरज मार्गे येथे दाखल झाले.पूर्वी नांद्रयाचे नाव ’नंदगाव’ असे होते.तेथे वनराजा राज्य करीत होता. तो हुशार जादूगार होता.अशी आख्यायिका आहे.तो जादूसाठी माणसाचे बळी घ्यायचा त्याचा पाडाव करण्यासाठी हे दोन बंधू नंदगाव येथे आले.ते बाहेर निवडूंगाच्या फडात राहू लागले वनराजाचा

कवठेएकंदची सप्तरंगी आतिषबाजी

कवठेएकंद(तासगाव) तेथे विजया दशमीला बिर्‍हाडसिध्दराज देवाच्या पालखी सोहळ्या निमित्त शोभेच्या दारूची सप्तरंगी आतषबाजी केली जाते.विज्ञान युगात उपलब्ध होणार्‍या नवनवीन तंत्रांच्या साह्याने होणारी आतषबाजी म्हणजे कवठे एकंदचा दसरा महोत्सव होय. येथे अन्य राज्यांतूनही लोक शोभेच्या दारूची आतषबाजी पाहण्यासाठी दरवर्षी येतात.सारा गाव आपल्या घरातील सण म्हणून यात सहभागी होतो.आतषबाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी असते.कवठेएकंद गाव सांगली-तासगाव रस्त्यावर सांगलीपासून

ऎतिहासिक तोरण भुईकोट किल्ला

शिराळ्याची भौगोलिक ठेवण तशी वैशिष्ठ्यपूर्ण आहे.येथे ऎतिहासिक,सांस्कृतीक,स्वांतत्र्यसंग्रामातील अनेक पाऊल खूणा आहेत. येथे तोरण ओढया लगतचा तोरण भुईकोट किल्ला शिवकालीन इतिहासाची साक्ष देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे वीस एंकरामध्ये त्याची उभारणी केल्याने त्यास विशेष महत्व आहे.किल्ल्यावर कोठेश्वराचे मंदीर, मुस्लिम बांधवांचा सलामसाहेब दर्गा, विहीर, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाकडे जाणारा भूयारी मार्ग, किल्ल्याच्या प्रवेसद्वारावरील विहीर, मजबूत तटबंदी ही वैशिष्ट्ये