गुरुवर्य कै. य. द. लिमयेसर

स्त्रीशिक्षणाचे सांगलीतील अग्रगण्य शिल्पकार गुरुवर्य कै. य. द. लिमयेसर राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेचे मुख्याध्यापक श्री. य. द. लिमये यांच्याशी माझी पहिली ओळख झाली ती १९६८ मध्ये. मला विज्ञानाची आवड असल्याने मुंबईच्या मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक श्री. म. ना. गोगटे यांना आमच्या वालचंद कॉलेजमध्ये भाषण देण्यासाठी सांगलीस मी बोलाविले होते. त्यांनी सांगलीत मराठी विज्ञान परिषदेची स्थापना करण्याची

गुरुवर्य नागेश व्यं. घोलबा(सर)

सांगली शहर आणि जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रावर ज्या काही निवडक गुरुजनांचा ठसा उमटला आहे. जवळ जवळ गेली चार तपे या परिसरातील विध्यार्थ्यात अत्यंत आदराने ज्यांचा आवर्जून नामोल्लेख होतो आहे अशा आदरणीय आणि विद्यार्थीप्रिय बोटावर मोजता येतील अशापैकीच एक सकल कलागुण संपन्न, अत्यंत शिस्तबध्द करडे परंतु विद्यार्थ्यावर मायेची पाखर घालणारे, त्यांच्यावर पुत्रवेत प्रेम करुन त्यांना सुसंस्कारित करण्याकरिता

प्रज्ञा प्रबोधिनीचे शिल्पकार गुरुवर्य नामजोशी सर

नामजोशी सरांचा जन्म २६ डिसेंबर १९१७ रोजी तासगावला झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही हे काही आप्तेष्टांच्या मदतीने मुंबई विद्यापीठाच्या तत्कालीन मॅट्रिक परीक्षेत १९३६ मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. घरच्या बिकट परिस्थितीमुळे उच्चशिक्षणाकडे पाठ वळवून नामजोशी सरांना नोकरी करावी लागली. त्यांनी शिकवण्या केल्या. नाईट स्कूलमध्ये शिकवले. शालेय शिक्षणापासूनच त्यांना कुशाग्र, बुद्धिमत्ता यामुळे ते एक