चांदोली धरण

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेले अशिया खंडातील क्रमांक दोनचे मातीचे धरण म्हणून चांदोली धरणाचे नाव चटकन डोळ्या पुढे येते.सुमारे ३४ टी एम.सी.पाणीसाठा असलेले व चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या तोंडाशी असलेले हे धरण निर्मिती पासूनच चर्चेत राहिले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पाथरपुंज येथे वारणा नदी उगम पावली आहे.शिराळा तालुक्याच्या हद्दीत अभयारण्यात असलेल्या प्रचीतगडाच्या पायथ्याशी राम नदीचा उगम आहे. या दोन नद्या धरणाच्या पाणीसाठयाचे मुख्य स्त्रोत आहेत. चांदोली गावाच्या हद्दीवर असल्याने चांदोली,तर वारणा नदीवर असल्याने वारणा म्हणून हे धरण प्रसिध्द आहे.

१९७८ ला धरणाच्या बांधकामापासून सुरू झालेला फक्त मुख्य कालवाच पूर्ण आहे.त्याच्या गळतीने शेतकरी हैराण आहेत.२६ किलोमीटरवर येऊन मुख्य कालव्याचे रूपांतर डाव्या व उजव्या कालव्यात झाले आहे.धरणाच्या पायथ्याशी असलेल्या प्रकल्पातून वीज निर्मिती केल्यानंतर बाहेर पडणार्‍या पाण्याचा सिचंना साठी वापर होतो.येथे १९९८-९९पासून ८ मेगावॉट क्षमतेची दोन जनित्रे एकूण १६ मेगावॉट वीजनिर्मिती करीत आहेत.चांदोली धरण हा पाण्याचा अमूल्य ठेवा आहे. नैसर्गिक देणगी लाभलेल्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात अडीच हजाराहून अधिक मिलीमीटर पाऊस पडतो.

धरणाच्या प्रवेशद्वारावर; तसेच माथ्यावर दक्षिण व उत्तरेला सुरक्षेसाठी दोन चौक्या आहेत.परवानगी घेऊनच धरण पाहण्यासाठी सोडले जाते. दुचाकी,चारचाकी घेऊन धरणाच्या सर्व भागात आरामदायी फिरता येते डोंगर, दर्‍या,प्रचंड पाणीसाठा, थंड हवा, शांत व नयनरम्य परिसर पाहून कोणालाही येथे मुक्काम जणू भुरळच पडते.उन्हाळ्याअ येथे येणार्‍या पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा आहे. वन विभागामार्फत पाणलोट क्षेत्रात चारही बाजूंनी पाणी असलेल्या टेकडीवर तंबू टाकण्यात येत. तेथे राहण्याची सोय जेवणाची सोय होती: येथून पुढे चांदोलीचा विकास खूप होणार आहे.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *