बत्तीस शिराळा नागपंचमी उत्सव

शिराळा हे सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर असलेले तालुक्याचे गाव आहे. येथे ऎतिहासिक, सास्कृतिक मोठी परंपरा आहे.पण शिराळ्याचे नाव सर्व दूर गेले ते नागपंचमी उत्सवा मुळे.महायोगी गोरक्षनाथांनी सुरू केलेल्या या नाग उत्सवाला सुमारे हजार वर्षाची पंरपरा आहे.पूर्वी येथे कोतवाल घराण्यातील मंडळी नाग पकडत होती. नागपंचमी दिवशी मातीच्या व कोतवालांनी पकडलेल्या जिवंत नागाची पूजा आज ही येथील महाजनांच्या घरी होते. नाग हे आदिमानवाचे एक आद्य दैवत. भीती पोटी द्रविडांच्यात नागपूजा सुरू झाली नागास मानवाचा रक्षक मानले जाते.येथील महिला नागाला भाऊ मानून पूजा करतात.नागपंचमी दिवशी कापणे, चिरणे, लोटणे आदी प्रकार महिला टाळतात.नाग सूक्ष्म जीव होऊन येईल व त्याची हत्या आपल्या हातून होईल, असा त्या मागे समज आहे.

सर्प शिराळकराचा मित्र किंबहुना दैवत आहे. येथील साप वर्षानुवर्ष मानवाच्या सान्निध्यात वावरत आले आहेत. सापाचे मानवाशी अतूट नाते निर्माण झाले आहे.ग्राम दैवत अंबामातेस नारळ फोडून बेंदराच्या सणापासून नाग पकडण्यास सुरवात होते.मातीच्या गाडग्यात त्यावर लोटके व रंगीत कपडयांनी झाकून नागांना सुरक्षित ठेवले जाते.त्याच्या आरोग्याची,आहाराची काळजी घेतली जाते.येथे अधिक संख्येने नाग सापडण्याला भौगोलिक कारण आहे.गावाचा परिसर खलाटीचा आहे.सर्व बाजूनी डोंगर व खोलगट परिसरात गाव वसले आहे.मऊ जमिन,उबदार हवा, मानवा पासून सुरक्षितता यांमुळे अनेकदा सर्प मुक्तपणे फिरताना आढळतात.

सुमारे तीस वर्षपासून प्रसारमाध्यमांनी मोठया स्वरूपात प्रसिध्द दिल्याने उत्सवाची माहिती सर्वदूर पोहचली. त्या मुळे नागपंचमीस जगविख्यात स्वरूप आले.त्यामुळे देश परदेशातून लाखो लोक येथे दरवर्षी येतात.निर्बधां मुळे नागांच्या जाहीर प्रदर्शनावर, स्पर्धावर बंदी आहे:

मात्र दरवर्षी नाग पकडून त्यांचे घरोघरी व ग्रामदैवत अंबामाता मंदिरात पूजन केले जाते.येणारे पर्यटक नागांचे दर्शन मंदिरात व घरोघरी घेतात.प्रतीकात्मक मिरवणूक निघते.त्यात विविध वाद्यवृंदांचा सहभाग असतो. लहान लहान मुले या दिवशी दंश न करणारे मोठे-मोठे साप गळयात घालून हिंडत असतात. गळयामध्ये सर्प घालून छायाचित्रे काढणार्‍या ंची तर रीघच लागते. नाग मंडळाच्यावतीने नाग स्पर्धांचे आयोजनही केले जाते. एकूण एक दिवसात लाखो लोकाची उलाढाल होते. नागपंचमीनतर पुन्हा नागाची पूजा करून त्यांना पकडलेल्या ठिकाणी सोडण्यात येते. यात्रेस पुन्हा गतवैभव मिळेल, यावर येथील सर्वाचा विश्वास आहे.  

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *