ब्रह्मनाळ

ब्रह्मनाळ(ता.पलूस) येथील कृष्णेच्या तीरावर असणारे रघुनाथ स्वामी व त्यांचे शिष्य आंनदमुर्ती यांची समाधी पंचक्रोशातील भाविकांची श्रध्दास्थाने आहेत  ब्रह्मनाळला कृष्णा आणि वेरळेचा संगम होतो.नदीकाठवरील झाडानी येथील वातावरण प्रसन्न होते.दरवर्षी कार्तिक महीन्यात आंनदमुर्ती व भाद्रपद व्दितीयेला रघुनाथ स्वामीच्या पुण्यतिथीचे येथे कार्यक्रम होतात.रमनवमीचा येथे मोठा उत्सव असतो.गावात मठ आहे. पाडव्यादिवशी मठातील सर्व देवांच्या मुर्ती वाजतगाजत समाधिस्थानी आणल्या जातात.या

जालिहाल येथील क्युरिओसिटी विज्ञान केंद्र

येरळा प्रोजेक्टस सोसायटी, सांगली या संस्थेतर्फे जत तालुक्यातील जालिहाल येथे डिजिटल स्कूल, क्युरिओसिटी सेंटर( विज्ञान शिक्षण केंद्र), शेळीपालन, येरळावाणी रेडिओ केंद्र असे अनेक समाजोपयोगी उपक्रम सुरू केले आहेत. ज्ञानदीप फौंडेशनचे डॉ. सु. वि. रानडे व अरविंद यादव तसेच मराठी विज्ञानपरिषद, मुंबई येथील श्री. हेर्लेकर यांनी येरळा प्रोजेक्टस सोसायटीचे प्रमुख श्री. नारायणराव देशपांडे यांचे समवेत या