भिलवडीचे दगडी घाट

भिलवडी येथील कृष्णा दगडी घाट वास्तुशिल्पाचा वैशिष्ठ्यपूर्ण नमुना आहे.कृष्णेच्या उगमापासून असा घाट आढळत नसल्याचा उल्लेख केला जातो.घाटाचा इतिहास मोठा रंजक आहे.इसवी सन १७७९ मध्ये मराठा सलतनीचे सरदार श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन यांनी बांधला.परशुरामभाऊंचा मुस्लिम सरदाराकडून १६९४ मध्ये पराभव झाला.या घाटाची लांबी सव्वा चारशे फूट आहे.एकशे दोन फूट रूंदी आहे दोन्ही बाजूला चार फूट व्यासाचे चौदा बुरूज आहे.बेचाळीस पायर्‍या आहेत.गावाकडील बाजूस दगडी ओवारी आहे.

ओवरीच्या पाठीमागील बाजूस घाटाच्या मध्यभागातून समांतर असे भुयार आहे.त्यातून महिला नदीपात्रात जात असत.नदीपात्रातील मध्यभागी महिलाच्या स्नानासाठी कुंडे होती.कुंडंच्या खोलगट भागात घोडे,जनावरे यांचे पाय अडकून अपघात होऊ लागल्याने कालांतराने येथे अष्टकोटी मंदीर बांधण्यात आले.त्यामध्ये शंकाराची पिंड आहे.घाटाच्या आणखी वैशिष्टयापैकी ओवारी पाहिले असता तो सपाट भासतो.महापुरातही ओवारी दगड सुस्थितीत आहेत.स्वातंत्र्योत्तर काळात या ओवारीमध्ये गावातील शेतक्री वर्गाच्या धान्याची साठवणूक होत असत.

गेल्या दोन-तीन दशंकात गावकर्‍यांनी या चिरंतन वास्तूच्या रक्षणासाठी काही पावले उचलली.ग्रामस्वच्छता अभियानाच्या पार्श्व भूमीवर या घाटाबाबत जागरूकता आणखी वाढली.कृष्णामाई उत्सव,दीपोत्सव अशा उपक्रमांच्या निमित्ताने घाटची स्वच्छता होते.ऎतिहासिक वास्तू बरोबर गावाची व परिसराची शान असलेला हा घाट चिरंतन प्रतीक आहे.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *