माजी नगराध्यक्ष डॉ. देवीकुमार देसाई

सांगलीचे माजी नगराध्यक्ष डॉ. देवीकुमार देसाई हे समाजसेवी डॉक्टर आणि लोकांसाठी झटणारे तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते होते. डॉक्टरांचे घराणेच समाजसेवकांचे. त्यांचे वडील डॉ. व्ही. एम. देसाई हे प्रख्यात धन्वंतरी होते. देसाई घराण्याची रुग्णसेवा आणि सामाजिक कार्याची परंपरा डॉ. देवीकुमार देसाई यांनी समर्थपणे पुढे चालविली. सांगलीचे जिमखाना, रोटरी क्लबचे जलतरण केंद्र अशा संस्थांच्या उभारणीत या घराण्याच मोठा

दानशूर राजमतीबाई पाटील

(१९१४-२००१)यांचा जन्म १७ मे १९१४ रोजी सांगलीजवळील समडोळी येथे झाला. यांनी जैन महिलांच्या शिक्षणासाठी बरेच प्रयत्न केले. जैन महिलाश्रम चालू केले. त्यांनी मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम केले आहे. नेमगोंडा पाटील व राजमतीबाई यांनी आपली सर्व मालमत्ता लठ्ठे पॉलिटेक्निकला दान म्हणून देऊन टाकली. त्यांचा श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट आहे. त्यांना ‘सांगलीभूषण’ किताब मिळाला.