वाळवे तालुक्यातील मंदिर

वाळवे तालुक्यातील मंदिरे रमणीय व प्रेक्षणीय आहेत .भाविकांसाठी व प्रेक्षणीय स्थळांना भेटी म्हणून ही मंदिरे महत्त्वपूर्ण आहेत.

श्री नरसिंह मंदिर

नरसिंहपूर :येथील स्वयंभू श्री नरसिंह मंदिर परिसरातील भाविकाचे श्रध्दास्थान आहे.इस्लामपूर शहरापासून पंधरा किलोमीटर वर नरसिंहपूर हे आहे.तेराव्या शतकातील हे हेमाडपंथी बांधकामाचे हे पुरातन मंदिर आहे.या मंदीराचे वैशिष्टय म्हणजे प्रथम या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापाना करण्यात आली व नतंर मंदिर बांधकाम करण्याता आले.

किल्लेमच्छिंद्रगड:

नाथपंथीयांचे श्रध्दास्थान म्हणून हे प्रसिध्द ठिकाण आहे.सांगली जिल्ह्यात असणार्‍या दोन गडापैकी हा एक गड आहे.या गडावर मच्छिंद्रनाथाची समाधी आहे गडावर दगडी बांधकामाचे मोठे मंदिर आहे.किल्ल्यावरून सूर्योदय व सूर्यास्ताचे विहंगम दृश्य दिसते.

मल्लिकार्जून देवस्थान:

येडेनिपाणी,गोटखिड व मालेवाडी या गांवाच्या दरम्यान डोंगररांगेत मल्लिकाअर्जून देअवस्थान आहे.राष्ट्रीय महामार्गालगतच्या या डोंगरावरील हे स्वयंअबू शिवलिग भाविकांचे श्रध्दास्थान आहे.या डोंगर माथ्यावर एक कबर आहे.हे हिंदू-मुस्लिम ऎक्याचे प्रतिक मानले जाते.दरवर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी यात्रा भरते.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *