खानापूर तालुक्यातील मंदिरे

खानापूर तालूक्यात पंधराहून अधिक रमणीय पर्यटन ठिकाणे आहेत.एक दिवसाची चांगली सहल या स्थळांना भेट देण्यासाठी होऊ शकते. रेवणसिध्द, मूळ स्थान गायमुख, दर्गोबा, वेताळगुरूदेव, जगलोबा, जोगिंदरबुवा, भीमाशंकर, शुकाचार्य, बाणूरगड, सुळकाई, राजुबुवाची समाधी यांचा त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल.काही ठिकाणी हिरवीगार झाडी, काही ठिकाणी विलोभनीय निसर्गसौदर्य यांमुळे पर्यटक आकर्षित होत आहेत.

सुळकाई मंदीर

:विटे शहराच्या ईशान्स सुळेवाडीच्या उत्तरेस डोंगराच्या उंच सुळक्यावर सुळकाई मंदीर आहे.या ठिकाणाहून सूर्यास्त पाहण्यासारखा असतो; 

वेताळगुरूदेव:

रेवणगावच्या उत्तरेस धोडगेवाडी बसस्थाब्या पासूनएक-दीड किलोमीटरवर वेताळ्गुरूदेव दे प्रसिध्द देवस्थान आहे.वेताळ्गुरूदेव हे रेवणगावचे ग्रामदैवत आहे.दरवर्षीचैत्र पाडव्या दिवशी यात्रा भरते तस्र्च हा परिसर गर्द वनराईने नटलेला आहे.

राजूबुवा देवस्थान:

घोटी खुर्द या तामखडीच्या दक्षिणेस अंदाजे तीन किलो मीटरवर असलेल्या गावी राजूबुवा नावाचे संत होऊन गेले राजुबुवाची समाधी गावात असून त्यावर मंदिर घोटी खुर्द व परिसरातील लोकानी लोकवर्गनीअतून बांधले आहे.तुकाराम बीजेमिमित्त रजूबुवांची यात्रा भरवली जाते.

जंगलोबा:

भांबर्डे गावाच्या पूर्वेस जंगलोबाचा डोंगर आहे.डोंगरावरून भांबर्डे तलाव, सुळकाई देवी तसेच देवनगर परिसराचे विहंगम दृश्य दिसते.

अगस्ती मंदिर:

महर्षी अगस्ती मुनीचे मंदिर तामखडीच्या दक्षिणेस एक किलोमीटरवर आहे. मंदिर अत्यंत पुरातन आहे मंदिरात अगस्ती व लोपामुद्रा यांच्या मूर्ती आहेत.

जालिंदरनाथ ऊर्फ जोगिंदरबुवा:

तामखडीच्या दक्षिणेस तीन किलोमीटरवर अडसरवाडी गावाच्या पश्चिमेस जालिंदरनाथांची मूर्ती आहे. या परिसरात मोठी आमराई असून भाविकांनई गुहेसमोर मंदिर बांधले आहे.

श्री भीमाशंकर:

भिवघाट येथे भीमाशंकर हे १२ जोतिर्लिंगापैकी एक जागरूक देवस्थान आहे.येथे जवळच एक तलाव आहे. परिसरात गर्द झाडी असल्याने संपूर्ण परिसर निसर्ग सौदर्याने नयनरम्य,मनोहारी कल्पकतेने सजल्यासारखा वाटतो.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *