संत कोटणीस महाराज
सांगलीचे संततिलक श्रीमत् कोटणीस महाराज हे सुमारे २५ वर्षे दररोज दोन तास कीर्तन करीत असत. त्यांनी कीर्तन करण्यासाठी कधीही पैसे घेतले नाहीत. त्यांची ही कीर्तन करण्याची परंपरा आजही त्यांच्या पुत्रपौत्रांनी कैवल्यधाममध्ये चालूच ठेवली आहे कोटणीस महाराजांचे समग्र जीवनातील ठळक घटनांचा आलेख जन्म सात नोव्हेंबर १८६४मौंजीबंधन इ. स. १८७३तीर्थरूपांचे निधन १८७७विवाह मे १८८१सद्गुरूंचा मंत्रोपदेश डिसेंबर १८८६डिस्टिृक्ट
उद्योगरत्न दादासाहेब वेलणकर
श्री गजानन वीव्हींग मिलची स्थापना व नामकरण केले. १९ जानेवारी १९४७ मध्ये दादासाहेबांची सुवर्णातुला थाटामाटात पार पडली होती. गांधी हत्येनंतरच्या काळातील मिलची राखरांगोळी झाली तरी चिकाटीने पुन्हा मिलची उभारणी केली. जगात वागावे कसे, मी कारखानदार कसा झालो यासारखी १४ पुस्तके लिहिली.
रुग्णसेवेमध्ये निरंतर रमलेले – हरिपूरचे परांजपे घराणे
सांगलीनजीकच, कृष्णा-वारणा संगमाच्या अन् डोंगरांच्या कुशीत वसलेले एक सुंदर मोहमयी बालग्राम- हरिपूर, संगमेश्वराच्या आस्तित्वानं पुनीत झालेलं हरिपूर, साहित्य-कला-नाट्य-संगीत अशा विविध क्षेत्रातील समर्थ परंपरा लाभलेलं हे गाव. याच हरिपूरमध्ये वैद्यकशास्त्राची अन् रुग्णसेवेची थोर परंपरा सुरू झाली आणि गावाची कीर्ती पार अटकेपार पोहोचली ती इथल्या ‘परांजपे ’घराण्यामुळे ! भिषग्रत्न वैद्य गणेश पांडुरंग परांजपे यांनी २ जानेवारी १८९२
धन्वंतरी आबासाहेब सांबारे
आबासाहेब सांबारे हे नामांकित वैद्य होते. ते विविध वनस्पतींचे काढे करुन व अर्क करुन औषधे बनवीत असत. त्यांनी औषधाचे पैसे कधीही घेतले नाहीत. त्यांनी कायमस्वरुपी तेरा फुटी लाकडी गणपती तयार करुन गणपती उत्सव सुरु केला.
मराठी विज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह श्री. अरविंद यादव
श्री. अरविंद यादव, सांगली यांनी आपल्या छंदातून रेखाटलेली पेन्सिल चित्रे परिचय जन्म – ८-५-१९३९ सांगली जिल्हा परिषदेत ३५ वर्षे सेवेनंतर १९९७ मध्ये निवृत्त. खेळ, फोटोग्राफी, १७० शास्त्रीय संगीत रागांचे संकलन ( १००० कॅसेटस् व १००० फोनोग्राम रेकॉर्डस् चा संग्रह. कै. मधुकर घारगे यांच्या वस्तुसंग्रहासाठी सहकार्य. निसर्ग प्रतिष्ठान, मराठी विज्ञान प्रबोधिनीचे १२ वर्षे कार्य. सध्या मराठी
अनाथ बालकांची माता – श्रीमती अंबुताई मेहेंदळे
प्रसूतिगृहसंचालिका, अनाथ बालकांची प्रेममयी माता व आदर्श समाजसेविका अशा अनेक रूपात सहजपणे वावरणार्या अंबुताई ह्या सांगलीत सर्वपरिचित आहेत. त्यांची जन्मभूमी जरी पुणे परिसरात असली तरी कर्मभूमी मात्र सांगली होती हे सांगलीवासियांचे महद्भाग्यच म्हटले पाहिजे! अंबुताईंचा जन्म पुण्याजवळील सासवड येथे झाला. लहानपणापासून त्या अत्यंत बुद्धिमान व अतिशय मायाळू स्वभावाच्या होत्या. दुर्दैवाने १५ व्या वर्षीच वैधव्य आल्याने
आदर्श समाजसेविका- श्रीमती सुमतीबाई फडके
सांगलीतील स्त्रीशिक्षण संस्था, मराठी विज्ञान प्रबोधिनी, निसर्ग प्रतिष्ठान या आणि अशाच सार्वजनिक संस्थांच्या जडणघडणीत ज्यांनी आपले सारे आयुष्य झोकून दिले त्या श्रीमती सुमतीबाई फडके यांचे जीवनचरीत्र सर्वानाच प्रेरणादायी ठरेल. आज आयुष्याची पंचाहत्तरी गाठूनही त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे.पुण्याच्या प्रतिष्ठित एस्. पी. कॉलेज आणि टिळक बी. एड. कॉलेज यांतून सन्मानपूर्वक पदवी घेतल्यानंतर सुमतीबाइंनी शिक्षण हेच आपले कार्यक्षेत्र