संत कोटणीस महाराज

सांगलीचे संततिलक श्रीमत् कोटणीस महाराज हे सुमारे २५ वर्षे दररोज दोन तास कीर्तन करीत असत. त्यांनी कीर्तन करण्यासाठी कधीही पैसे घेतले नाहीत. त्यांची ही कीर्तन करण्याची परंपरा आजही त्यांच्या पुत्रपौत्रांनी कैवल्यधाममध्ये चालूच ठेवली आहे

कोटणीस महाराजांचे समग्र जीवनातील ठळक घटनांचा आलेख

जन्म सात नोव्हेंबर १८६४
मौंजीबंधन इ. स. १८७३
तीर्थरूपांचे निधन १८७७
विवाह मे १८८१
सद्गुरूंचा मंत्रोपदेश डिसेंबर १८८६
डिस्टिृक्ट प्लीडर परीक्षा उत्तीर्ण फेब्रु. १८९२
बेळगाव येथे वकिली सप्टेंबर १८९३ ते डिसेंबर १८९७
सांगलीत आगमन व कायम वास्तव्य एप्रिल १९००
नित्य कीर्तनास प्रारंभ जून १९००
गुरूपादुकांची प्राप्ती डिसेंबर १९०७
धर्मपत्नीचे निधन जून १९१२
पितृतुल्य चुलत्यांचा मृत्यु नोव्हेंबर १९१२
मातश्रींचे दहहावसान सप्टेंबर १९१६
चिमड मठातील दुमजली बांधकाम फेब्रुवारी ते ऑक्टोंबर १९२२
मठातील अन्नपूर्णागृहाचे बांधकाम जून १९२३
आयुष्यातील अखेरचे कीर्तन २४ जानेवारी १९२४
श्रीतात्यांचे महाप्रयाण २७ जानेवारी १९२४
( पौष वद्य षष्ठी शके १८४५)

ग्रंथसंपदा
१) कैवल्य पुरूष खंड १ ला व २ रा
२) कैवल्य – विधि
३) कैवल्य – प्रसाद
४) कैवल्य कुंज
५) कैवल्य संकीर्तन
६) कैवल्य-मार्ग ( नित्य नियम भजन विधि)
७) सांगलीचे संततिलक श्रीमत् कोटणीस महाराज ह्यांचे चरित्र

कै. हणमंतरावजी कोटणीस यांचे चरित्र
लेखक – साधुदास
इ. स. १९३७

कै. हणमंतरावजींच्यासारख्या साधूंच्या आचरणात आढळून येणारा एकसारखेपणा हा निर्जीव वस्तूच्या स्वरूपासारखा एक ठशाचा दिसला, तरी तो त्याहून अत्यंत भिन्न स्वरूपाचा व म्हणून विचारार्ह आहे. मृत मनुष्याची शांतता व प्रतिक्रिया करण्याचे सामर्थ्य अंगी असता शांति धरणाऱ्या मनुष्याची शांतता यातील फरकाप्रमाणेच तो फरक आहे. प्रतिक्रियेचे सामर्थ्य असता शांति धरणाऱ्या मनुष्याची शांतता ही त्याचे आध्यात्मिक सामर्थ्य दर्शविते. तसेच चंचल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्रे चित्त वेगवेगळया क्रिया करण्यास लोटित असता पोटाचा व्यवसाय व सभोतालची मंडळी बहुरंगाची असताना आपला अध्यात्मरंग अखंड कायम ठेवून एकसारखे अखंड साधनानुष्ठान दोन दोन तपे करणे हा एकसारखेपणा उपेक्षणीय नव्हे तर मोठा चिन्त्य आहे. विषयरंग उडविण्याचे सामर्थ्य असता हा मनुष्य मोठ्या आनंदाने एकच गोष्ट करीत बसत आहे, याला एवढा विनामूल्य मिळणारा सुखाचा ठेवा कोणचा मिळाला आहे याचा विचार करणे अत्यंत जरूर आहे.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *