ऐतिहासिक विहीर,मिरज
मिरज येथे आदिलशहाच्या काळातील हैदरखान नावाच्या सरदाराने ७५० वर्षापूर्वी १५० बाय १५० फूट आकाराची व ६० फूट खोल अशी विहीर बांधली आहे. मिरजेतील रेल्वेस्थानकात असलेल्या ऐतिहासिक हैदरखान विहिरीतून सात वर्षांपूर्वी दुष्काळात लातूरकरांचीही तहान भागविण्यात आली होती. मात्र, आता विहिरीचा वापर नसल्याने विहिरीचे डबके झाले आहे. या विहिरीचे पुनरुज्जीवन करून ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी होत