कुंडलचे प्राचीन जैन तीर्थक्षेत्र

दक्षिण महाराष्ट्रातील जैन तीर्थक्षेत्रां पैकी कुंडल एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे.तीन हजार वर्षापूर्वी जैन धर्मीयांचे २३ वे तीर्थकर पार्श्वनाथ भगवताची धर्मसभा आणि २७०० वर्षापूर्वी २४ वे तीर्थकर वर्धमान महावीरची धर्म सभा येथे झाली येथील दक्षिणाभिमुख पार्श्वानाथ जिनमंदीर गावाच्या मध्यभागी ग्रामपंचायतीजवळ आहे. पाच फूट चार इंच उंचीची पद्मासन असलेली कृष्णवर्णीय वालुकामय केलेली मूर्ती भव्य अशा चौथर्‍यावर स्थित

तुंगचा मारूती

सांगली पासून १२ किलोमीटर अंतरावर तुंग गाव वसलेले आहे.अलीकडे या गावाची ओळख स्वच्छता अभियानामुळे राज्यभर झाली आहे.यापूर्वी आकाशवाणीचे प्रक्षेपण केंद्र, प्रादेशिक नळ-पाणीपुरवठा योजना व ढबू मिरचीमुळे गावाची ओळख आहे.मारूतीच तुंगं अशी साडेतीनशे वर्षापासूनची गावाची ख्याती आहे. गावाच्या मध्यभागी हनुमान मंदिर आहे. १८९५ मध्ये श्री.वासुदेव मेहेंदळे यांनी हनुमान जन्मोत्सवास सुरवात केली. श्रींची मुर्ती उत्कृष्ट कोरीव कामाची

संभुअप्पा समाधी

तीनशे वर्षाची पंरपरा असलेली इस्लामपूरची तेथील संभुअप्पा उरूस हिंदू-मुस्लिम ऎक्याचे प्रतीक आहे.संभुअप्पा समाधिस्थळ परिसर शहराचे सांस्कृतिक संचित आहे.राज्यभरातील व कर्नाटकातील भाविकांची परिसराचे वैशिष्टय आहे.पौर्णिमेचा दिवस संभूअप्पांचा जन्मदिवस मानला जातो.या कालावधीत पंधरा दिवस उरूस भरतो.इस्लामपूर लगतच्या पूर्वीच्या यमाई तलावाच्या पूर्वेस प्रशस्त जागेत मठ उभारला आहे.मठाभोवती भव्य तंटबंदी व बुरुज आहेत. मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला खोल आड

खानापूर तालुक्यातील मंदिरे

खानापूर तालूक्यात पंधराहून अधिक रमणीय पर्यटन ठिकाणे आहेत.एक दिवसाची चांगली सहल या स्थळांना भेट देण्यासाठी होऊ शकते. रेवणसिध्द, मूळ स्थान गायमुख, दर्गोबा, वेताळगुरूदेव, जगलोबा, जोगिंदरबुवा, भीमाशंकर, शुकाचार्य, बाणूरगड, सुळकाई, राजुबुवाची समाधी यांचा त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल.काही ठिकाणी हिरवीगार झाडी, काही ठिकाणी विलोभनीय निसर्गसौदर्य यांमुळे पर्यटक आकर्षित होत आहेत. सुळकाई मंदीर :विटे शहराच्या ईशान्स सुळेवाडीच्या

कवठेमहांकाळची महांकाली

कवठेमहांकाळ येथे श्री महांकाली देवीचे मंदीर आहे.त्यामुळे गावाला कवठेमहांकाळ असे नाव पडले आहे.श्री महांकालीदेवीचा नवरात्र उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. आश्विन शुध्द प्रतिपदा ते शुध्द दशमी (दसरा)असा देवीचा उत्सव साजरा केला जातो.या काळात गामिण भागातून भाविक येतात. दसर्‍या दिवसी शोभेच्या दारूची आताषवाजी,लेझीम,ढोल,दांडपट्टा दूध वाटप, टिपर्‍या डान्स असे विविध कार्यक्रम रात्रभर चालू असतात. विठ्ठल मंदीर

गोरक्षनाथांचे मंदिर

शिराळ्यात पंढरीच्या विठुरायाऎवढेच गोरक्षनाथ मंदीरास महत्व आहे.एकादशीला सांगली,कोल्हापूर,सातारा जिल्ह्याती भाविक येथे दर्शनासाठी येतात.येथे जगप्रसिध्द नांगपंचमीची सुरूवात ही गोरक्षनाथानीच केली.हनुमान जयंतीनंतर येणार्‍या एकादशी पासून चैत्र कृष्ण ११ पासून यात्रेस सुरवात होते.त्याचा कालावधी आठ दिवसाचा असतो.या काळात राज्याच्या विविध भागातून अनेक वारकरी येतात. मंदिरामागे तोरण मोरण नदीचा संगम आहे.दर बारा वर्षानी कुंभमेळ्यानंतर झुडीने नाथाचे पाईक येतात.दक्षिणाभिमुख मारूती,विठ्ठ्ल

श्री बनशंकरीचे देवस्थान

जत तालुक्यातील ठिकाणापासून उत्तरेल १२ किलोमीटर पाच हजार लोकवस्तीचे गाव आहे.गावाशेजारील छोटया डोंगराच्या कुशीत हिरवेगार घनदाट बन आहे.या गर्द वनराईत श्री बनशंकरीचे देवस्थान आहे.कायम दुष्काळी गावात बसलेले हे ठिकाण वाळ्वंटातील ओअ‍ॅसिसप्रमाणे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. चारी बाजूला छोटया टेकडया, मधोमध लहानशी दरी. दरी मध्ये आंबा, चिंच, जांभूळ, पिंपळ, वड, नीलगिरी, सीताफळ व रामफळाचे उंचच उंच

वाळवे तालुक्यातील मंदिर

वाळवे तालुक्यातील मंदिरे रमणीय व प्रेक्षणीय आहेत .भाविकांसाठी व प्रेक्षणीय स्थळांना भेटी म्हणून ही मंदिरे महत्त्वपूर्ण आहेत. श्री नरसिंह मंदिर नरसिंहपूर :येथील स्वयंभू श्री नरसिंह मंदिर परिसरातील भाविकाचे श्रध्दास्थान आहे.इस्लामपूर शहरापासून पंधरा किलोमीटर वर नरसिंहपूर हे आहे.तेराव्या शतकातील हे हेमाडपंथी बांधकामाचे हे पुरातन मंदिर आहे.या मंदीराचे वैशिष्टय म्हणजे प्रथम या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापाना करण्यात आली