कुंडलचे प्राचीन जैन तीर्थक्षेत्र

दक्षिण महाराष्ट्रातील जैन तीर्थक्षेत्रां पैकी कुंडल एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे.तीन हजार वर्षापूर्वी जैन धर्मीयांचे २३ वे तीर्थकर पार्श्वनाथ भगवताची धर्मसभा आणि २७०० वर्षापूर्वी २४ वे तीर्थकर वर्धमान महावीरची धर्म सभा येथे झाली येथील दक्षिणाभिमुख पार्श्वानाथ जिनमंदीर गावाच्या मध्यभागी ग्रामपंचायतीजवळ आहे. पाच फूट चार इंच उंचीची पद्मासन असलेली कृष्णवर्णीय वालुकामय केलेली मूर्ती भव्य अशा चौथर्‍यावर स्थित आहे. कलिकुंड पार्श्वनाथ मंदिराच्या गावाच्या पश्चिमेस दोन किलोमीटर वरील पहाडावर श्री झरी पार्श्वनाथ हे दुसरे मंदिर आहे.तेथे तीनशे पायर्‍या चढून जावे लागते.पार्श्वनाथच्या पश्चिमेला बारमाही वाहणारा झरा आहे.

श्री कलिकुंड पार्श्वनाथांचा पालखी व पूजा महोत्सव प्रतिवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी होतो.यासाठी राज्यातून जैन समाजातील लोक मोठया संख्येने येतात.अलीकडेच गावातील धर्मशाळेच्या जीर्णोद्वाराचे काम विश्वस्तानी हाती घेतले आहे.याच बरोबर झरी व गिरी पार्श्वनाथ दोन्ही पहाडावर यात्रे करूसाठी पिण्याचे पाणी, वीज व सुलभ रस्त्याच्या व्यवस्थेसाठी परिसर विकास मंडळाचेही प्रयत्न सुरू आहेत.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *