मराठी विज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह श्री. अरविंद यादव

श्री. अरविंद यादव, सांगली यांनी आपल्या छंदातून रेखाटलेली पेन्सिल चित्रे परिचय जन्म – ८-५-१९३९ सांगली जिल्हा परिषदेत ३५ वर्षे सेवेनंतर १९९७ मध्ये निवृत्त. खेळ, फोटोग्राफी, १७० शास्त्रीय संगीत रागांचे संकलन ( १००० कॅसेटस्‌ व १००० फोनोग्राम रेकॉर्डस्‌ चा संग्रह. कै. मधुकर घारगे यांच्या वस्तुसंग्रहासाठी सहकार्य. निसर्ग प्रतिष्ठान, मराठी विज्ञान प्रबोधिनीचे १२ वर्षे कार्य. सध्या मराठी

अनाथ बालकांची माता – श्रीमती अंबुताई मेहेंदळे

प्रसूतिगृहसंचालिका, अनाथ बालकांची प्रेममयी माता व आदर्श समाजसेविका अशा अनेक रूपात सहजपणे वावरणार्‍या अंबुताई ह्या सांगलीत सर्वपरिचित आहेत. त्यांची जन्मभूमी जरी पुणे परिसरात असली तरी कर्मभूमी मात्र सांगली होती हे सांगलीवासियांचे महद्भाग्यच म्हटले पाहिजे! अंबुताईंचा जन्म पुण्याजवळील सासवड येथे झाला. लहानपणापासून त्या अत्यंत बुद्धिमान व अतिशय मायाळू स्वभावाच्या होत्या. दुर्दैवाने १५ व्या वर्षीच वैधव्य आल्याने

आदर्श समाजसेविका- श्रीमती सुमतीबाई फडके

सांगलीतील स्त्रीशिक्षण संस्था, मराठी विज्ञान प्रबोधिनी, निसर्ग प्रतिष्ठान या आणि अशाच सार्वजनिक संस्थांच्या जडणघडणीत ज्यांनी आपले सारे आयुष्य झोकून दिले त्या श्रीमती सुमतीबाई फडके यांचे जीवनचरीत्र सर्वानाच प्रेरणादायी ठरेल. आज आयुष्याची पंचाहत्तरी गाठूनही त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे.पुण्याच्या प्रतिष्ठित एस्. पी. कॉलेज आणि टिळक बी. एड. कॉलेज यांतून सन्मानपूर्वक पदवी घेतल्यानंतर सुमतीबाइंनी शिक्षण हेच आपले कार्यक्षेत्र

माजी नगराध्यक्ष डॉ. देवीकुमार देसाई

सांगलीचे माजी नगराध्यक्ष डॉ. देवीकुमार देसाई हे समाजसेवी डॉक्टर आणि लोकांसाठी झटणारे तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते होते. डॉक्टरांचे घराणेच समाजसेवकांचे. त्यांचे वडील डॉ. व्ही. एम. देसाई हे प्रख्यात धन्वंतरी होते. देसाई घराण्याची रुग्णसेवा आणि सामाजिक कार्याची परंपरा डॉ. देवीकुमार देसाई यांनी समर्थपणे पुढे चालविली. सांगलीचे जिमखाना, रोटरी क्लबचे जलतरण केंद्र अशा संस्थांच्या उभारणीत या घराण्याच मोठा

दानशूर राजमतीबाई पाटील

(१९१४-२००१)यांचा जन्म १७ मे १९१४ रोजी सांगलीजवळील समडोळी येथे झाला. यांनी जैन महिलांच्या शिक्षणासाठी बरेच प्रयत्न केले. जैन महिलाश्रम चालू केले. त्यांनी मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम केले आहे. नेमगोंडा पाटील व राजमतीबाई यांनी आपली सर्व मालमत्ता लठ्ठे पॉलिटेक्निकला दान म्हणून देऊन टाकली. त्यांचा श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट आहे. त्यांना ‘सांगलीभूषण’ किताब मिळाला.

Translate »