शिवकालीन इतिहसाचा साक्षीदार म्हणून गणल्या गेलेल्या शिवछ्त्रपतीचे सच्चे सेवक बहिजी नाईक यांची समाधी आहे.खानापुर तालुक्यात रेवागिरी डोंगरातून फिरताना सहलीच्या आंनदाची एक वेगळीच पर्वणी मिळ्ते रेवागिरी डोंगररंगएच्या पूर्व टोकावर बाणूरगड हे गाव आहे.बाणूरगडचा किल्ला भूपाल राजाने बांधला अदिलशहाकडून हा किल्ला शिवाजीमहाराजानी जिंकून घेतला.दगडी कमानी कोरून केलेल्या बारा वाटा येथे आहेत.त्यातून वाकून जावे लागते.समुद्र सपाटीपासून साडेतीन फूट उंचीवर ठिकाण आहे.
शिवकालात भूपालगड या नावाने हा गड परिचित होता.गडाच्या बाबतीत विविध अख्यायिका सागितल्या जातात.किल्ल्याला बाणाचा आकार असल्याने त्यास बाणूरगड हे नाव पडले.रेवागिरी डोंगररांग पुरातन महादेव मंदीर आहे.बहिजी नाईक याची समाधी आहे.दगडी बांधकामाचा तलाव. आहे.कराड-विजापूर रस्त्यावर पळ्शी किवां जरंडी पत्रा येथे उतरावे तेथून पुढे चार किलों मिटरवर शुकाचार्य आहे.तेथून पाच किलीमीटर अंतरावर बाणूरगड किल्ला आहे.


