खिद्रापूर

खिद्रापूर हे भूतपूर्व कोल्हापूर संस्थानातील शिरोळ तालुक्यातील पूर्वेकडील शेवटचे गाव. येथे कृष्णा नदी उत्तर दक्षिण वाहिनी असून या नदीच्या पश्चिम किनार्‍या वर गावाच्या पूर्वेस हे कलापूर्ण शिल्पकला असलेले कोपेश्वर देवालय आहे.  खिद्रापूरच्या कोपेश्वराचे मंदीर तर इतके अप्रतिम आहे की, हे मंदीर पाहिल्यानंतर इतके सुंदर शिल्प उपेक्षित रहावे याची खंत वाटल्यावाचून राहात नाही. कोपेश्वर मंदिर हे

शिराळ्यातील गोरक्षनाथ मंदिर

शिराळ्यात पंढरीच्या विठुरायाएवढेच गोरक्षनाथ मंदीरास महत्व आहे.एकादशीला सांगली,कोल्हापूर,सातारा जिल्ह्याती भाविक येथे दर्शनासाठी येतात.येथे जगप्रसिध्द नांगपंचमीची सुरूवात ही गोरक्षनाथानीच केली.हनुमान जयंतीनंतर येणार्‍या एकादशी पासून चैत्र कृष्ण ११ पासून यात्रेस सुरवात होते.त्याचा कालावधी आठ दिवसाचा असतो.या काळात राज्याच्या विविध भागातून अनेक वारकरी येतात.मंदिरामागे तोरण मोरण नदीचा संगम आहे.दर बारा वर्षानी कुंभमेळ्यानंतर झुडीने नाथाचे पाईक येतात.दक्षिणाभिमुख मारूती,विठ्ठ्ल रखुमाई

संगमेश्वरचे हरिपूर

सांगलीतून तीन किलो मीटरवर  पशिचमेस निसर्गारम्य हरिपूर आव आहे. हरिपूरला कृषणा-वारणेच्या संगमावरचे संगमेश्वरचे हरिपूर या ओळखीच्या स्वतंत्र खूणा आता पुसट होत चालल्या आहेत.अश्मयुगकालीन अवशेष सापडल्याची महाराष्ट्रातील जी काही ठिकाणे आहेत.त्यात सांगली जिल्हातील वाळवे, विटे, व हरिपूरचा समावेश आहे.ज्ञात इतिहासाप्रमाणे मिरजेचे संस्थानिक सरदार गोंविद हरी पटवर्धन यांनी वडिलांच्या स्मरणार्थ हरिपूर हे गाव वसवले.अगदी संगमाच्या काठावर संगमेश्वराचे

करगणीचे लखमेश्वर

दक्षिण भारतात शंकराची प्रत्यक्ष आत्मलिंगे असलेली तीन तीर्थ क्षेत्रे आहेत.त्यापैकी एक आटपाडी तालुक्यातील करगणी येथील लखमेश्वर (श्रीराम मंदिर) होय. हा परिसर म्हणजे रामाणयातील दंडकारण्याचा भाग होय.मंदिराच्या आत व बाहेर अप्रतिम कलाकुसर आहे.सुदंर मोर, कृष्णावातारातील शिल्पे,वाद्ये वाजविणारा कलाकार समुद्रगुप्त व इतर नक्षीकाम सुदंर कोरलेले आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवसा पासून भव्य यात्रा भरते.पहिल्या दिवशी पारण्याचा

गुड्डापुरची धानम्मादेवी

श्री धानम्मदेवी महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील वीरशैव लिंगायत समाजाच्या लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे.जत पासून २२ किलोमीटर पूर्वेला गुड्डापूर गावी देवीचे मंदीर आहे. ऎतिहासिक गावात बाराव्या शतकात आई सिरस्म्मा व वडील अनंतराया यांच्या घरी धानम्मादेवीने जन्म घेतला धार्मिक वृत्तीच्या धानम्माने समाजातील अनिष्ट रूढी,परंपरा व अंधश्रध्दा नष्ट करण्यासाठी  वयाच्या दहाव्या वर्षापासूनच प्रयत्न सुरू केले.जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी

बागेतील गणपती

सांगलीतून हरिपूरकडे कृष्णा-वारणेच्या संगमाकडे वाटेत जाताना हमखास थांबण्याची एक ठिकाण आहे.ते म्हणजे पुरातन श्री गणपती मंदिर व त्या भोवतालची दाट झाडी.त्यामुळे या ठिकाणाला बागेतला गणपती असे म्हणतात.धार्मिक माहात्म्या बरोबरच एक पिकनिक स्पॉट म्हणून हे रम्य ठिकाण लोकप्रिय होत आहे. गणेशाची नगरी म्हणून सांगलीची ओळख आहे. या गणप्ती मंदीरापेक्षाही हे पुरातन मंदीर आहे.मिरज जहागिरीच्या गोविंद हरी

कुंडल डोंगरावरील श्री वीरभद्र देवस्थान

कुंडल गावाच्या पश्चिमेकडील डोंगराचरील श्री वीरभद्र देवस्थान आहे.हे लिगायत समाजाचे देवस्थान आहे. डोंगरावर असलेली बहामनी कालीन लेणी(गुहा)वैशिष्टपूर्ण आहेत.गावाच्या पश्चिमेस असलेला श्री वीरभद्र डोंगर पर्वताच्या रांगाचे शेवटचे टोक आहे. श्री वीरभद्र देवस्थान जमिनीच्या सपाटीपासून ३०० फूट उंचीवर आहे.मूर्ती तीन फूट उंचीची आहे.  प्रतीवर्षी कार्तिक आमावस्येला येथे यात्रा भरते. श्री वीरभद्रदेवीचा विवाह सोहळा विविध कार्यक्र्मांनी होतो.यासाठी महाराष्ट्रातून,कर्नाटकातून

बिरोबा धनगर समाजाचे दैवत

कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी गाव म्हटले,की डोळ्यांपुढे  उभे राहते बिरोबा देवस्थान.बिरोबा हे धनगर समाजाचे आराध्य दैवत मानले जाते.बिरोवा दैवत लिगायत आहे. ब्रम्हा,विष्णू,महेश या मूर्ती बिरोबा मंदिरात आहेत,कर्नाटकातूनच हे देव डोंगरावर आले.या डोंगरावरूनच देव भक्ताच्या दर्शनासाठी आरेवाडीच्या बनात आले. यात्रेच्या पहिल्या दिवशी गोडाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो.बिरोबाच्या उजव्याबाजूला बिरोबाचा भक्त सुर्‍याबा याचे मंदिर आहे.त्याच्या पलीकडे मायाक्कादेवीचे मंदिर

विलोभनीय डोंगराई

सह्याद्री पर्वत रांगाच्या शेवटच्या टोकाचरील माथ्यावर कडेपूर येथील डोंगराई देवीचा डोंगर पर्यटकांना भुरळ घालतो. डोंगराई देवीचे माहात्म्य खूप मोठे आहे. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविक मोठ्या श्रध्देने येतात. भाविकाचे हे श्रध्दास्थान आहे. कडेगावच्या दक्षिणेला हा डोंगर आहे.हे मंदिर शिवकालीन आहे.देवीची आकर्षक व सुबक मूर्ती आहे. डोंगराईदेवीची श्रावण महिन्यात मंगळवारी आणि शुक्रवार व पौष महिन्याच्या

पलूसचे दैवत धोंडिराजमहाराज

पलूस गावचे आराध्य दैवत श्री समर्थ धोंडीराज महाराज यांना दत्ताअवतारी संत समजले जाते.महाराजाचा जन्म १८२० मध्ये मिरज तालूक्यातील सध्याचे कांचनपूर आणि त्यावेळचे खरकटवाडी या गावी झाला असावा असे सागितले जाते. महाराज लहानपणा पासून ते वैरागी वृतीचे होते.लिहीण्या-वाचण्याचा त्यांना गंध नव्हता अंगावर अत्यंत साधे कपडे, भीक मागणे, मिळेल ते खाणे, परिसरात भटकणे हा त्यांचा दिनक्रम होता.सतत

Translate »