सांगली जिल्ह्यातील प्रेक्षणीय व पवित्र ठिकाणे

मिरज१) सांगली येथील श्री गणेश मंदीर व कृष्णाकाठी कै. वसंतरावदादांची समाधी.२) सांगली येथील आयर्विन पुल व गणेश दुर्ग.३) हरिपूर येथील कृष्णा व वारणा नद्यांचा संगम वश्रीसंगमेश्वर देवालय, बागेतील गणपती.४) तुंग येथील समर्थ रामदास स्वामींनी स्थापनकेलेले श्री मारुती मंदीर.५) मिरज येथील रेल्वे जंक्शन, ख्वाँजा शमशुद्दीन मिरासाहब दर्गा.६) भोसेजवळ दंडोबा डोंगरावरील दंडेश्वर मंदीर व अभयारण्य.७) बेळंकीजवळ श्री

आंबराई उद्यान

सांगली शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे आंबराई उद्यान वृक्षवेलींनी बहरलेले असते. आंबराई उद्यान म्हणजे सांगलीचा नैसर्गिक ठेवा आहे. शासनाच्या उपवने व उद्याने विभागाच्या प्रयत्नाने तयार झालेले हे उद्यान सध्या सांगली महानगरपालिकेच्या देखरेखीखाली आहे.

प्रतापसिंह उद्यान

सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक आकर्षक असे उद्यान तयार केले असून या उद्यानास भूतपूर्व सांगली संस्थानचे युवराज कै. प्रतापसिंह यांचे नाव देण्यात आले आहे. या उद्यानात एक सुसज्ज असे प्राणी संग्रहालय असून त्यामध्ये वन्य प्राणी व विविध प्रकारचे रंगी-बेरंगी पक्षी ठेवण्यात आले आहेत.

सागरेश्वर अभयारण्य

श्री सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील एक रम्य,निसर्गसौंदर्यांने नटलेले,प्राणी,पक्षीनी समृध्द असे पर्यटन स्थळ आहे. कडेगाव वाळवा व पलूस तालूक्याच्या सीमा जोडणार्‍या सह्याद्रीच्या सागरेश्वर पर्वताच्याअ माथ्यावर हे ठिकाण आहे.अभयारण्या मध्ये उष्ण-कोरडया हवामानातील पानझडी,काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. धावडा, वड,पिपळ,आपटा ,सीताफळ तसेच माकडी धायटी,घाणेरी ,करवंद,सालफळ आदी झुडपे आढळतात.अभयारण्यातील साळिंदर,सांबर,चितळ,काळ्वीट,खोकड,कोल्हा,लांडगा,तरस आदी प्राणी पर्यटकांसाठी आकर्षण आहेत.धामण,नाग,मरण्यार घोरपड,हे सरपटणारे प्राणी

दंडोबा हिल स्टेशन

मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळ पट्टा असूनही पाहण्यासारखे आणि पाहिल्यानंतर लक्षात राहण्यासारखे कोण्ते निसर्गरम्य ठिकाण असेलतर डोंगर भोसे,मालगाव,सिध्देवाडी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत दंडोबा हा डोंगर पसरला आहे.देशिंग गावाच्या हद्दीत डोंगरावर महादेवाचे स्वयंभू स्थान आहे. डोंगरावर वन विभागाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने जुनी व नवीन अशी फार दाट झाडी आहे. नानविधि प्रकारची वनराई, डोंगर पोखरून तयार करण्यात

चांदोली अभयारण्य

चांदोली अभयारण्य सांगली,सातारा,कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौ. किलोमीटर परिसरात वसले आहे. राज्यातले निर्मनुष्य असणारे हे सर्वात मोठे अभयारण्य आहे.सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये असलेल्या आणि निसर्गाच्या विपूल संपत्तीने नटलेल्या चांदोली अभयारण्यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे. विविध प्रकारची झाडे,वृक्षवेली,औषधी वनस्पती,विविध प्राणी या सर्वामुळे चांदोलीचे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांचे आकार्षण ठरत आहे. या अभयारण्यात सांबर,गवा,गेळा,अस्वल,भेकर,कोंळ्शिदा,तरस,साळिदंर,खवले मांजर,रानकुत्रा,कोल्हा.डुक्क्कर