पलूसचे दैवत धोंडिराजमहाराज

पलूस गावचे आराध्य दैवत श्री समर्थ धोंडीराज महाराज यांना दत्ताअवतारी संत समजले जाते.महाराजाचा जन्म १८२० मध्ये मिरज तालूक्यातील सध्याचे कांचनपूर आणि त्यावेळचे खरकटवाडी या गावी झाला असावा असे सागितले जाते. महाराज लहानपणा पासून ते वैरागी वृतीचे होते.लिहीण्या-वाचण्याचा त्यांना गंध नव्हता अंगावर अत्यंत साधे कपडे, भीक मागणे, मिळेल ते खाणे, परिसरात भटकणे हा त्यांचा दिनक्रम होता.सतत रामनामाचा जप करीत. महाराजाचे वास्तव्य पलूस येथे राहू लागले.महाराजांचे पारमार्थिक गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ होते.

पलूसच्या मध्यावर्ती चौकात समाधी मंदिर आहे.तेथे दरोज सकाळी व रात्री पूजाअर्चा,आरती आदी सोपस्कार नित्यनियमाने चालतात. प्रत्येक शनिवारी, अमावस्येला,पौर्णिमेला भाविकाची गर्दी होते.प्रत्येक अमावस्येला तेथील दानशूर भक्त महाप्रसादाचे वाटप करतात. प्रतिवर्षी चैत्र वद्य व्दादशी ते चैत्र आमावास्या या कालावधीत महाराजांची मोठी यात्रा भरते. महाराजांच्या भव्य संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. वैशाख शुध्द नवमीला महाराजांच्या पुण्यतिथीचा मोठा कार्यक्रम होतो.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »