सांगली पासून १२ किलोमीटर अंतरावर तुंग गाव वसलेले आहे.अलीकडे या गावाची ओळख स्वच्छता अभियानामुळे राज्यभर झाली आहे.यापूर्वी आकाशवाणीचे प्रक्षेपण केंद्र, प्रादेशिक नळ-पाणीपुरवठा योजना व ढबू मिरचीमुळे गावाची ओळख आहे.मारूतीच तुंगं अशी साडेतीनशे वर्षापासूनची गावाची ख्याती आहे.
गावाच्या मध्यभागी हनुमान मंदिर आहे. १८९५ मध्ये श्री.वासुदेव मेहेंदळे यांनी हनुमान जन्मोत्सवास सुरवात केली. श्रींची मुर्ती उत्कृष्ट कोरीव कामाची आहे. श्रीच्या पाठीमागे चांदीची प्रभावळ आहे.गाभारा दोन मजली आहे.लाकडी छत व बाहेर दीपमाळ आहे.सभामंडपाच्या बाजूला शिवपिंड व संगमरवरी दत्त मूर्ती आहे. शनिवारी, आमवास्या, पौंर्णिमेला भक्तांची गर्दी होते. चैत्रशुध्द अष्टमीपासून हनुमान जंयतीपर्यत मोठा जन्मोत्सव होतो.सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, प्रवचन, भारूड कार्यक्रम होतात.हनुमान जन्मकाळाला येथे मोठी यात्रा भरते.
या दिवशी पहाटे पंचामृत पूजा होते.त्यानंतर कीर्तन होते. सूर्योदय होताच श्री च्या पाळण्यावर पुष्पवृष्टी होते.रणशिगाच्या टाळ-मृदुंगाच्या गजरात सुवासिनी पाळणा गातात.दुपारी खिरीचा प्रसाद होतो.रात्री श्री ची भव्य पालखी निघते.ओव्या, भारूड, भजन म्हणत सूर्योदयावेळी पालखी कृष्णा नदीकाठी नेतात.’श्री’ना स्नान घालून परत मंदिरात आल्या नतंर उत्सवाची सांगता होते.मंदिरातील कार्यक्र्मात गावातईल सर्वधर्मी लोक सहभाग घेतात.