कवठेमहांकाळ येथे श्री महांकाली देवीचे मंदीर आहे.त्यामुळे गावाला कवठेमहांकाळ असे नाव पडले आहे.श्री महांकालीदेवीचा नवरात्र उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो.
आश्विन शुध्द प्रतिपदा ते शुध्द दशमी (दसरा)असा देवीचा उत्सव साजरा केला जातो.या काळात गामिण भागातून भाविक येतात. दसर्या दिवसी शोभेच्या दारूची आताषवाजी,लेझीम,ढोल,दांडपट्टा दूध वाटप, टिपर्या डान्स असे विविध कार्यक्रम रात्रभर चालू असतात.
विठ्ठल मंदीर व महांकाली मंदिर,मध्यभागी खुली जागा,गाभार्यात महादेवाची पिडं,एक सापडलेली मूर्ती ,दुसरी करून बसवलेली.गणपती, मारूतीच्या मूर्ती आहेत.या मंदीराच्या पूजा-अर्चेच्या व्यवस्थेसाथी २८ एकर जमिनीचे वतन आहे.दर्शनी दरवाजात दरवाजात दररोज सकाळी सनई-चौघाडयाचे मंगल व मंजूळ स्वर भक्तांच्या कानी पडावेत म्हणून नगारखाना बांधण्यात आलाहोता:पण ही योजना काळाच्या ओघात मागे पडली.