१९४१ ३० सप्टेंबर सांगली बँकेचा रौप्य महोत्सव.
१९४१ २ नोव्हेंबर डॉ. आंबेडकर दुसर्यांदा सांगलीत आले. त्यांचा सांगली बारतर्फे सत्कार झाला.
१९४२ राधाकृष्ण यांची सांगलीस भेट. १९४२ च्या चळवळीतील श्रीमती अरुणा असफअली, श्री. अच्युतराव पटवर्धन यांच्यासारखे क्रांतीकारक सांगलीत आश्रयासाठी होते.
१९४२ १४ ऑगस्ट ४२ सांगलीच्या जुन्या स्टेशन चौकात क्रांतीकारकांविरुध्द गोळीबार.
१९४३ २४ जुलै १९४३ श्री. वसंतरावदादा पाटील यांनी तुरुंग फोडले. त्याच दिवशी आण्णा पत्रावळे व बाबुराव जाधव हुतात्मा झाले व श्री वसंतरावदादा यांच्या खांद्यातून गोळी जाऊन ते जखमी झाले. १९४३ मध्ये सांगलीत नाट्य शताब्दी महोत्सव साजरा झाला. या महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सांगलीत आगमन. ७ ऑगस्ट ४३ नामदार श्रीनिवास शास्त्री यांचे सांगलीत आगमन.
१९४४ ११ ऑगस्ट रॅगलर र. पु. परांजपे यांची हायकमिशनर म्हणून सांगलीस भेट, २६ सप्टेंबर ४४ रोजी पुण्याचे माजी मेजर बाबूरावजी जगताप यांची सांगलीस भेट.
१९४४ ऑगस्टमध्ये विजयसिंह मॉन्टेसरी शाळेची स्थापना
१९४४ २ जून ४६ सांगलीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २२ डिसेंबर ४६ डॉ सी. व्ही. रामन यांची सांगलीस भेट.
१९४७ सांगली शहराचा पहिला मास्टर प्लॅननुसार झाला.महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या धोंडुमामा साठॆ यांनी सांगलीस न्यू इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन केले.( त्याचेच पुढे १९५५ मध्ये वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज असे नामकरण करण्यात आले.)
१९४७ १५ ऑगस्ट ४७ सांगलीत स्वातंत्र्योत्सव साजरा.
१९४८ ७ मार्च ४८ श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब राजेसाहेब सांगली यांनी रुपये ३५ लाखाचा ट्रस्ट करुन तो सांगली नगरपालिकेच्या स्वाधीन केला.
१९४८ १ फेब्रुवारी महात्मा गांधी वधोत्तर सांगलीत प्रचंड जाळपोळ.
१९४८ ८ मार्चला सांगली संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. अँडमिनिस्ट्रेटर श्री देसाई हे आले. सांगली ही दक्षिण सातारा जिल्ह्याची राजधानी झाली.
१९५० १५ जानेवारीस बॅ. मुकुदराव जयकर यांची सांगलीस भेट. ३० ऑगस्टला सांगलीस मार्केट अँक्ट लागू झाला. मिलिटरी बॉईज होस्टेलची सांगलीत स्थापना. प्लेगची साथ.
१९५१ महात्मा गांधीच्या पुतळयाचे मुंबईचे मेयर स. का. पाटील यांच्या हस्ते अनावरण.
१९५२ सांगली नगरपरिषदेत श्री. बाळासाहेब चव्हाण यांची चिठ्ठ्या टाकून नगराध्यक्षपदी निवड. रिमांड होमची स्थापना. भारताचे सरसेनापती जनरल के. एम. करिआप्पा यांची सांगलीस भेट.
१९५४ ९ जानेवारीस भारताचे उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची सांगलीस भेट.
१९५५ २५ मे ला अ. भा. कॉंग्रेस अध्यक्ष ढेबरभाई यांच्या हस्ते कॉंग्रेस भवनची कोनशीला बसविण्यात आली.
१९५६ सांगलीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना.
१९५७ शंकरराव देव यांचे सांगलीत आगमन.
१९५८ सांगली महिला परिषदेचा रजत महोत्सव, राज्यपाल श्रीप्रकाश अध्यक्ष म्हणून हजर.
१९५९ १४ मे ला विनोबा भावे यांची सांगलीत पदयात्रा. १३ ऑक्टोबरला श्रीमती इंदिरा गांधी यांचा अखिल भारतीय कॉंग्रेस अध्यक्षा म्हणून सांगलीत आगमन.
१९६० हि. हा. चिंतामणराव पटवर्धन कॉलेज ऑफ कॉमर्सची स्थापना.
१९६१ कृष्णा नदीस मोठा महापूर आला. सांगली नगरपालिकेची नवीन इमारत वापरात आली.
१९६२ १. भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु यांची सांगलीस भेट. २. जिल्हा परिषदेची स्थापना. यापूर्वी जिल्हा लोकल बोर्ड होते. ३. ३१ जुलै ला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते अश्वारुढ शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे उद्घाटन.
१९६३ सांगली आकाशवाणी केंद्राची स्थापना. नवीन सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीचे मुख्यमंत्री श्री कन्नमवार यांच्या हस्ते उद्घाटन.
१९६४ १ जूनला नगरपालिका प्राथ. शिक्षण मंडळाची स्थापना.
१९६५ सांगलीत सहकारी चित्रपटाची स्थापना. २३ फेब्रुवारीस राजेसाहेब चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन.
१९६६ २३ ऑक्टोबरला सांगली बँकेचा सुवर्ण महोत्सव.
१९६७ २६ जानेवारीस श्री वसंतदादा पाटील यांना पद्मभूषण किताबाने गौरविले गेले शासकीय अपंग बालक संस्था स्थापना.
१९६७ ११ डिसेंबरला सांगलीत भूकंपाचा मोठा धक्का.
१९६९ सांगली (जिल्हा) नगरवाचनालयाचा शतसांवत्सरिक महोत्सव.
१९६९ विलिंग्डन महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव.
१९७० जिल्हा परिषद सांगलीची नवीन अद्ययावत इमारत बांधली.
१९७१ १२ एप्रिल ७१ मिरज सांगली रेल्वे लाईन बंद झाली.
१९७१ १५ एप्रिल ७१ सांगली ब्रॉडगेज स्टेशन झाले.
१९७२-१९७३ दुष्काळ
१९७४ १३ मार्च ७४ महाराष्ट्राचे राज्यपाल अलियावर जग यांची सांगली नगरपरलिकेस भेट.
१९७४ १० ऑक्टोबर ७४ बिहारचे राज्यपाल आर. डी. भंडारे यांची सांगली नगरपालिकेस भेट.
१९७४ १७ डिसेंबर ७४ नगरपालिका नवीन कायद्याप्रमाणे नगराध्यक्षांचा थेट निवडणूक या पध्दतीने डॉ. देवीकुमार देसाई यांचा प्रथम नगराध्यक्ष म्हणून निवड.
१९७६ फेब्रुवारी मार्च सांगलीत मोठी टायफाईडची साथ.
१९७६ २ सप्टेंबर ७६ सांगलीचे प्रसिध्द लेखक वि.स.खांडेकर निधन पावले. १३ नोव्हेंबर पद्मभूषण वसंतदादा यांचा शष्ट्यब्दीपूर्ति समारंभ. ६ डिसेंबर क्रांतिकारक नाना पाटील यांचे निधन.
१९७७ १७ एप्रिल ७७ वसंतरावदादा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले.