निसर्ग मित्र संस्था, सांगली

निसर्ग जोपासना व पर्यावरण परिरक्षण करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन ही संस्था स्थापन झाली आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याला पर्यावरण व प्रदूषणविषयक ज्ञान देण्याचा संस्थेचा हेतू आहे. शाळा, कॉलेजमध्ये इको क्लब (पर्यावरण वाहिनी) स्थापन करून संस्थेने हे काम सुरू केले आहे. जिल्हापरिषद, शिक्षण विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषिखाते यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे काम चालू आहे. संस्थेचे आतापर्यंत ५० आजीव व १००० विद्यार्थी सभासद झाले आहेत.
संस्थेतर्फे सागरेश्वर अभयारण्य, मायणी अभयारण्य, दंडोबा याठिकाणी दरवर्षी निसर्गशिबिरे आयोजित केली जातात. निबंधस्पर्धा, प्रदर्शने, सहली व विद्यार्थ्यांकडून पर्यावरणविषयक समस्यांविषयी प्रकल्प केले जातात. पर्यावरणविषयक उत्कृष्ट कार्य करणार्‍या व्यक्तींना `निसर्गमित्र’ पुरस्कार दिले जातात.

संस्थेचे पदाधिकारी – अध्यक्ष- श्री. तानाजीराव मोरे, कार्याध्यक्ष- डॉ. विजयकुमार शहा, खजिनदार- प्रा. चंद्रशेखर कुलकर्णी, कार्यवाह – श्री. श्रीकांत वि. रानडे
संस्थेचा पत्ता -श्री. श्रीकांत वि. रानडे, यशोदीप, सीतारामनगर, डॉ. आंबेडकर रोड, सांगली, फोन – २५३०५८४

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *