दुर्लक्षित कोटलिंग डोंगर

शिराळा-वाळवे तालुक्याच्या सिरहद्दीवर दुर्लक्षित मात्र निसर्गरम्य कोटलिग डोंगर पर्यटनासाठी सुदंर आहे.वाळवे तालुक्यातील डोंगरवाडी व शिराळ तालुक्यातील लादेवाडीच्या गावाच्या दरम्यान असणारा कोटलिंग डोंगर हिरव्यागार वनराईच्या सान्निध्याने नटलेला आहे.या डोंगरावरील शिराळ तालुक्याच्या लादेवाडी गावाकडील बाजूला पुरातन काळातील चार गुहा आहेत. डोंगरावरील एका गुहेची नजर पोहचत नाही इतकी लांबी आहे:मात्र गुहेच्या तोंडचीव रुंदी कमी असल्याने आत जाता येत नाही.नवाळवे व शिराळ तालुक्यांत विस्तारलेला हा प्रचंड डोंगर आहे.याच स्थितीत राहिला तर त्याचे माहात्म्य समजणार नाही त्यासाठी उपलब्ध माहितीवर शासनाने या ठिकाणी पर्यटनाच्या सुविधा पुरवाव्यात,अशी मागणी आहे.

नैसर्गिक देणगी लाभलेल्या या परिसरात लादेअवादी जवळ मोठा बांधीव तलाव आहे. वनविभागाने तलाव व कोंटलिग परिसरात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे.त्यामुळे या परिसरात दाट झाडी आहे.दुर्लक्षा मुळे मोठया प्रमाणात वृक्ष तोंड सुरू आहे. मुबलक पाण्याचा परिसर असुन सुध्दा तलाव दुरूस्ती अभावी पाण्याची मोठया प्रमाणात गळती होत आहे.वाळवे तालुक्याच्या डोंगरवाडी जवळ मारूतीचे पुरातन मंदीर आहे. डोंगराच्या कुशीत वसलेले हे श्रध्दास्थान आहे. या मंदिराच्या भोवती डोंगराच्या रांगा व दाट झाडी आहे.सात-आठ किलोमीटर लांबीचे पठार अर्धा किलोमीटर रूंदीचे आहे.पठारावर पाण्याची सुविधा नसल्याने माणसाची वर्दळ या ठिकाणी कमीच आहे.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *