खानापूर तालुक्यात मोजक्या धार्मिक स्थळांम्ध्ये दर्गोबाचा समावेश करावा लागतो. डोंगरकपारीत असलेल्या या ठिकाणाचे वेगळे वैशिष्टय मानावे लागले.खानापूर तालुक्यातील सुवर्णनगरी म्हणून पारे गाव ओळखले जाते.
विटया पासून नऊ किलोमीटर अंतरावर डोंगर-दर्याचा हा परिसर आहे.येथे बारा जोतिर्लिगांपैकी चौथे स्थान म्हणून ओळखल्या जाणार्या दर्गोबाचे पुरातन मंदिर आहे.सभोवताली गर्द झाडी,डोंगर-दर्यांचा परिसर,तलावाचे स्वच्छ पाणी,नौकाअ विहार यांमुळे एक दिवसाच्या सहलीचे आंनददायी ठिकाण म्हणून याचा उल्लेख केला जातो. प्रत्येक रविवारी व पौंर्णिमेला येथे भाविकाची गर्दी असते.साडेसातशे पायर्या चढून मंदिरात जावे लागते.डोंगर-दर्याचा हा परिसर असल्याने त्यास मोत्यांचा माळ असेही म्हणतात.विविध नावांनी परिचित असलेली बारा खोरी येथे आहेत.
सौदल,टाकण,चारोळी,तेंदू,पळस,गुंजपाला,बिबा,धायटी,धावड,करवंद या औषधी वनस्पती देखील येथे आढळतात.पारे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे येथील मंदिर हेमाडपंथी आहे.वनखात्याने येथे वनखात्याने येथे वन उद्यानाचा प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे.विटयाच्या दक्षिणेला नऊ किलोमीटर अंतरावर पारे गाव आहे.तेथून दोन किलोमीटर अंतरावर दर्गोबाचा रमणीय परिसर आहे.