कैवल्यधाम

कैवल्यधाम
पांडुरंग रघुनाथ कोटणीस
`कैवल्यधाम’, संत कोटणीस महाराज रोड,
सांगली – ४१६४१६

ती. परमपूज्य तात्यासाहेब कोटणीस महाराज हे दक्षिण महाराष्टृातील एक थोर संत होते.
संत कोटणीस महाराजांचे चरित्र आणि त्याचे संपूर्ण कीर्तन वाचा)
सांगलीतील कैवल्यधाम हे निंबरगी व चिमड मठाची उपशाखा म्हणून १९३९ पासून कार्य करीत असून तेथे गेली अनेक वर्षे मंत्रोपदेशाचे व संप्रदायसंवर्धनाचे कार्य सुरू आहे.

मुख्य दर्शनी देवस्थानांत निंबरगीकर महाराजांच्या पादुका, रामचंद्रराव चिमड महाराजांच्या पादुका व तात्यासाहेब कोटणीस महाराजांच्या पादुका अशी त्रिमूर्तींची स्थापना केलेली असून, श्रीतात्यांना मिळालेल्या त्यांच्या सद्गुरूंच्या खडावा व निंबर्गीमहाराजांच्या स्मारक वस्तू ह्या स्मारकाचे तळाशी आहेत. चिमड येथील साधुमहाराजांच्या दहनभूमीवरील पवित्र वटवृक्षाची काष्ठेे आणवून त्यापासून समाधीजवळचा उंबरा तयार करून घेण्याची दादांची कल्पकता व गुरूभक्ती और आहे. कैवल्यधामाच्या पायऱ्या चढून आंत प्रवेश करतांच, ,का प्रशस्त हॉलमध्ये अनेक साधुसंतांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. सभामंडपाचे वरच्या मजल्यावर तात्यासाहेबांचे पारमार्थिक ग्रंथसंग्रहालय आहे

दादासाहेबांच्या पश्चात् त्यांचे कनिष्ट चिरंजीव श्री. गुरूनाथ हे तात्यासाहेबांकडून व पिताजी दादासाहेबांकडून आलेला सर्व पारमार्थिक वारसा अत्यंत श्रद्धेने, उत्साहाने व बिनचूक चालवीत आहेत.

पहाटे काकड आरती, प्रभाती पूजा, दोन प्रहरी पुन: आरती नैवेद्य सायंकाळी पोथीवाचन, रात्रौ पंचपदी, शेजारती हे नित्य उपचार श्रीसमाधीस अखंडपणे होत आहेत. इतकेच नव्हे तर तात्यासाहेबांच्या काळात सुरू झालेली नित्याची कीर्तनसेवा आजही विनाखंड प्रतिदिवशी होत आहे.

कैवल्यधामात नित्योपचारांखेरीज, सांप्रदायिक महत्वाच्या व्यक्तींच्या आराधना, श्रावण सोमवारी पालखी, कार्तिकात व पौष महिन्यात तात्यासाहेब महाराजांचा अनुक्रमे जयंती व पुण्यतिथी उत्सव, त्याचप्रमाणे रामजन्म, हनुमानजयंती, दत्तजयंती असे कार्यक्रम असतात.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *