पहिले चिंतामणराव उर्फ आप्पासाहेब पटवर्धन
१८०१ मध्ये मूळ मिरज जहागिरीतून फुटून आप्पासाहेबांनी आपलं वेगळं राज्य बनविलं व त्यांनी सांगली राजधानी केली. सांगली राजधानीची स्थापना केल्यानंतर १८०४ मध्ये गणेशदुर्ग या भुईकोट किल्लयाचे बांधकाम त्यांनी करुन घेतले. सांगलीच्या आराध्य देवतेचे श्री गणेश मंदिराचे बांधकाम १८११ साली सुरु झाले. श्रीगणपतीपंचायतन म्हणून हे ओळखले जाते. या मंदिरात श्रीगणेश, शिव, सूर्य, चिंतामणेश्वर, लक्ष्मी – नारायण