सांगलीचा इतिहास इ. स. १८०१ ते इ. स. १९००
१८०१ सांगली हे राजधानीचे गांव झाले. म्हणजेच श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीस आले. गणेशदुर्गाच्या बांधकामास प्रारंभ केला. १८०६ सांगलीच्या श्रीगणपती मंदिराची आखणी झाली. १८०७ सांगलीच्या पेठांची आखणी व वसाहतीला प्रारंभ झाला. १८०८ पटवर्धनांतील वाटण्या पूर्ण झाल्या व सांगली हे जहागिरीचे गांव निश्चित झाले. १८११ गणेशदुर्गाचे काम पूर्ण झाले. १८१८ इंग्रजांनी पेशव्यांचे राज्य घेतले व सर्व सरदारांना