गुरुवर्य कै. य. द. लिमयेसर
स्त्रीशिक्षणाचे सांगलीतील अग्रगण्य शिल्पकार गुरुवर्य कै. य. द. लिमयेसर राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेचे मुख्याध्यापक श्री. य. द. लिमये यांच्याशी माझी पहिली ओळख झाली ती १९६८ मध्ये. मला विज्ञानाची आवड असल्याने मुंबईच्या मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक श्री. म. ना. गोगटे यांना आमच्या वालचंद कॉलेजमध्ये भाषण देण्यासाठी सांगलीस मी बोलाविले होते. त्यांनी सांगलीत मराठी विज्ञान परिषदेची स्थापना करण्याची