शिराळ्यातील गोरक्षनाथ मंदिर

शिराळ्यात पंढरीच्या विठुरायाएवढेच गोरक्षनाथ मंदीरास महत्व आहे.एकादशीला सांगली,कोल्हापूर,सातारा जिल्ह्याती भाविक येथे दर्शनासाठी येतात.येथे जगप्रसिध्द नांगपंचमीची सुरूवात ही गोरक्षनाथानीच केली.हनुमान जयंतीनंतर येणार्‍या एकादशी पासून चैत्र कृष्ण ११ पासून यात्रेस सुरवात होते.त्याचा कालावधी आठ दिवसाचा असतो.या काळात राज्याच्या विविध भागातून अनेक वारकरी येतात.मंदिरामागे तोरण मोरण नदीचा संगम आहे.दर बारा वर्षानी कुंभमेळ्यानंतर झुडीने नाथाचे पाईक येतात.दक्षिणाभिमुख मारूती,विठ्ठ्ल रखुमाई मंदीर याच मंदिराच्या परिसरात आहे.पूर्वी या मंदिरात गोराक्ष चिंचेचे भले मोठे वृक्ष होते त्या चिंचेचा आयुर्वेदिक  औषधे बनविण्यासाठी उपयोग होतो.

यात्रेच्या पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी राज्यातील विविध भागातून येणार्‍या वारक्री दिंडयाचे स्वागत ग्रामपंचायत व ग्रामस्थ करतात.सकाळी ११ वाजता पालखी निघते.हिरालाल बाळ्कृष्ण परदेशी यांना पालखीचा मान आहे.दरवर्षी ग्रामपंचायतीमार्फप कुस्ती मैदान भरवले जाते.यात्रा कालावधीत मंदीराच्या परिसरात भजन ,कीर्तन, सोंगी भजन,भारूडाचे कार्यक्रम होतात.तालुक्याच्या सर्व गांवातील बहुतांश भजनी मंडळीचा यात सहभाग असतो.एकुण सात दिवसांच्या काळात येथे विविध प्रकारची दुकाने, मनोंरंजनाच्या साधनाची लाखो रूपयांची उलाढाल होते.तालुक्यातील नागरिकांसाठी ही यात्रा म्हणजे पर्वणीच असते.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »