विलोभनीय डोंगराई

सह्याद्री पर्वत रांगाच्या शेवटच्या टोकाचरील माथ्यावर कडेपूर येथील डोंगराई देवीचा डोंगर पर्यटकांना भुरळ घालतो. डोंगराई देवीचे माहात्म्य खूप मोठे आहे. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविक मोठ्या श्रध्देने येतात. भाविकाचे हे श्रध्दास्थान आहे. कडेगावच्या दक्षिणेला हा डोंगर आहे.हे मंदिर शिवकालीन आहे.देवीची आकर्षक व सुबक मूर्ती आहे. डोंगराईदेवीची श्रावण महिन्यात मंगळवारी आणि शुक्रवार व पौष महिन्याच्या पौर्णिमेला अशी तीन वेळा यात्रा भरते.शिवाय कदेपूर आणि हिंगणगाव खुर्द येथून मानाच्या पालख्या देवीच्या भेटीला येतात.हे स्थळ सांगली सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असणार्‍या सह्याद्री पर्वतरांगाच्या शेवटच्या टोकावर असणार्‍या पठारावर वसलेले आहे. 

डोंगराईदेवीचे मंदिर आकर्षक आहे.पौर्णिमेला, मंगळवारी शुक्रवारी शेकडो भाविक व पर्यटक येत असतात.संबध डोंगरमाथ्याला झाडीने वेढून टाकले आहे.डोंगराच्या पश्चिमेला तळे आहे.यातील पाणी पर्यटकांना डोळ्यात साठवून ठेवण्याचा आंनद मिळतो .पावसाळ्यात हिरवेगार वातावरण असते.डोंगरावरून कराड येथील कृष्णा-कोयना नदीचा पवित्र संगम दिसतो. सूर्य मावळतीला आल्यानंतर या संगमाचे विलोभनीय दृश्य मन हेलकावून टाकते.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »