शिराळ्याची भौगोलिक ठेवण तशी वैशिष्ठ्यपूर्ण आहे.येथे ऎतिहासिक,सांस्कृतीक,स्वांतत्र्यसंग्रामातील अनेक पाऊल खूणा आहेत. येथे तोरण ओढया लगतचा तोरण भुईकोट किल्ला शिवकालीन इतिहासाची साक्ष देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे वीस एंकरामध्ये त्याची उभारणी केल्याने त्यास विशेष महत्व आहे.किल्ल्यावर कोठेश्वराचे मंदीर, मुस्लिम बांधवांचा सलामसाहेब दर्गा, विहीर, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाकडे जाणारा भूयारी मार्ग, किल्ल्याच्या प्रवेसद्वारावरील विहीर, मजबूत तटबंदी ही वैशिष्ट्ये आहेत.
छत्रपतीच्या काळात येथे उदाजी चव्हाण नावाचा किल्लेदार होता.शिराळ्यात कोकरूढ रस्त्यालगत तोरण ओढयालगत असलेल्या किल्ल्याची आज दुरवस्था झाली आहे.जमिनीवर बांधलेल्या या किल्ल्यासाठी वापरलेल्या मातीची मोठी विक्री झाली आहे.दरवर्षी कोटेश्वर मंदीरात भंडार होतो. सलामसाहेब दर्ग्यार उरूस भरतो.शिवकालीन इमारतींचे अवशेष आजही येथे पहायला मिळ्तात.