सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटना
सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटना, सांगली
सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटना, सांगली जिल्ह्यामध्ये १९८१ पासून कार्यरत आहे. नोंदणी मात्र १९८९ साली झाली आहे.
संघटनेची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे :-
१. नोंदणी नं. : एम. ए. एच. २२५७/एफ-२२१९,१६ जानेवारी १९८१
शाखा : जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधून २१८ शाखा कार्यरत आहेत.
संघटनेचे कार्य
१. बालविवाहास स्थगिती
२. अंधश्रद्धा निर्मूलन
३. देवदासी व जटा निर्मूलन
४. महिलांचे सर्व प्रश्न सोडविणे, हुंडाबंदी, स्त्री- अत्याचार, विवाहितांचा छळ, स्त्री हत्या, विसंवाद निर्मान झालेल्या कुटुंबामध्ये तडजोड घडवून आणणे किंवा तडजोडीने वेगळे करणे.
५. परित्यक्ता, विधवा, अपंग, दुर्धर रोगी महिलांचे प्रश्न सोडविणे.
६. विधवा महिलांच्या पुनर्विवाहास सहाया देणे.
७. संजय गांधी निराधार योजनेतून अनेक महिलांना सहाय्य देणे.
८. साक्षरता मोहीम.
९. मातृ प्रबोधन वर्ग
१०. कुटुंब कल्याण वर्ग
११. झोपडपट्टीतून बालवाड्या सुरू.