यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या आईवडिलांचे लहानपणीच निधन झाले. लहानपण पद्माळे येथे गेले. त्यांनी कॉग्रेस कमिटीची स्थापना केली. १९४० मध्ये स्वातंत्र्यकाळात तुरुंगवास भोगला. १९४२ नंतर प्रशस्त क्रांतीच्या लढ्यात भाग घेतला. १९४३ मध्ये तुरुंगवास भोगला. एकदा तुरुंग फोडून त्यांनी पलायन केल्यानंतर परत अटक करुन १३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. राजेसाहेबांनी १९४६ रोजी वसंतदादांची सुटका केली. क्रांतीचा मार्ग सोडून विधायक कार्याकडे लक्ष केंद्रित केले.
जागतिक मार्केट यार्डची स्थापना त्यांनी केली. १९५८ साली सांगली साखर कारखाना सुरु केला. सांगली औद्योगिक सहकारी सोसायटी, तेलगिरण्या स्थापन केल्या. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. मिरज मेडिकल कॉलेज सुरु केले. १९६६ रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. १९७२ साली महाराष्ट्र पाटबंधारे व वीज मंत्री होते. चार वेळा महाराष्ट्नचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.
बुधगांव येथे इंजिनिअरिंग कॉलेज सुरु केले. विना अनुदान तत्वावर अभियांत्रिकी महाविद्यालयांना महाराष्ट्रात परवानगी दिली. राजस्थानचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले. माणसे जोडण्याची कला, मृदु स्वभाव यामुळे ते प्रसिद्ध होते. त्यांनी काँग्रेस बांधणीचे कार्य केले. सांगलीच्या सर्वांगीण प्रगतीस त्यांनी चांगलाच हातभार लावला.