येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी ही सांगलीतील एक नावाजलेली सामाजिक सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या कार्यक्षेत्रतील लाभार्थी, आश्रयदाते, कार्यकर्ते व हितचिंतक या सर्वांच्या सद्भावना व परिश्रम यांमुळे हा सेवाभाव अनेक अंगांनी विस्तारीत गेला. संस्था बिकट परिस्थितीतील लोकांच्या समस्यांवर उपाय शोधत आपली वाटचाल करते, त्यात काही यश मिळवते आणि या खचलेल्या लोकांपुढे आत्मविश्वासाचा मार्ग प्रशस्त करून पुढच्या काळासाठी त्यांच्याच बरोबर राहण्याचा विश्वास देते.
यामुळे गावोगावची खेडूत मंडळी येरळा संस्थेला आपल्या ह्रदयांतरी स्थान देतात. आपुलकी आणि विश्वास यांच्या आधाराने फुलणारी ही १९७२ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी जे स्वयंसेवी कार्येकर्ते दुष्काळ्ग्रस्तांच्या मद्तीला धावून गेले. त्यांनीच एकत्र येऊन १९७६ मध्ये ही विश्वस्त भूमिका प्रभावीपणे वठवली, त्यामुळे समाजातील सर्व स्तरातून विश्वासच मिळाला. संस्थेने योजिलेले प्रकल्प हे ‘लोक-उपक्रम’ठरले.
ग्रामीण भागातील दुर्बळ घटक हा संस्थेने केंद्रबिदू मानला. त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी निरीक्षण-गरज -प्रयोग-कार्यवाही अशा क्रमाने सांगली जिल्हातील कमळापुर येथील प्रयोग उभे राहात गेले, खेडयांतील ग्रामस्थांना एकत्रित करून त्यांच्या समस्यांची तड लावण्यासाठी खर्या गरजूंच्या अपेक्षा जाणुनच कार्यक्र्म राबविले जातात.
सांगली शहरापासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर जत तालुक्यातील आडवळ्णी गावे कर्नाटकाच्या सीमेवर आहेत. मोलमजुरी किंवा अतिकष्टाची कामे करण्यासाठी हे लोक सधन शेतीच्या मुलुखात कित्येक महिने स्थंलातर करतात. शेतीसाठी कूपनलिका, पाण्यासाठी पाईपलाईन, बियाणे यांची तरतूद केल्यावर शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहू लागेल. हे होऊ शकते याची त्यांना खात्री पटली. गरजू व्यक्तीला केलेल्या मदतीचे ओझे वाटू नये अशी काळजी घेण्यात येते.
जत तालुक्यातील जालीहाळ जवळपासच्या दुष्काळी खेडयांतून संस्थेचे कार्य चालू आहे. गावांतून महिलामंडळ स्थापन झाली आहेत. जरूर तर थोडी आर्थिक शक्ती संस्था पुरविते. सहकारी पतसंस्थेमुळे त्यांना आर्थिक व्यवहार कळू लागला आहे. शिक्षण-आरोग्य या मूलभूत गरजांसाठी विशेष प्रयत्न आवश्यक असून त्यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी कार्यकर्त्यांची मदत घेण्यात येते.
कमळापूर भागातील प्रकल्प
घरकुल योजना
लाभार्थीकडील उपलब्ध सामग्री व त्याचे श्रम यांचा वापर करून उभारलेली घरे एकूण संख्या अकराशे, लाभार्थी राहणीमान आणि विचारसरणी यांमध्ये आमूलाग्र बदल.
शेळी पालन-
संस्थेकडे जातिवंत दीडशे – दोनशे शेळ्या. गरजूंसाठी पथदर्शी प्रकल्प. पूरक व्यवसायातून लोकांना चांगली मिळकत शंभर कुटुबांना रोजगार.
दुध संकलन-
दुभती जनावरे घेण्यासाठी अर्थसाहाय्य,जातिवंत जनावरे उपलब्थ, दुधप्रक्रिया, वितरण, दुग्धपदार्थ निर्मिती इत्यादी संपुर्ण यंत्रणा. उत्पादकांना स्पर्धात्मक हमी.
शेती सुधारणा-
परिसरातील ओढयांवर ३६ ठिकाणी बंधारे, ७५ विहीरीची खुदाई, सपाटीकरण, शेतांना बांध इत्यादी. रोपवाटीका, भाजी-पाल्यासाठी तरू, बियाणे पुरवठा. कृषिमार्गदर्शन व प्रात्यक्षिके. बहुउदेशीय शेतीसंघ व प्रत्येक बाबतीत प्रशिक्षण.
ग्रामीण उद्योग-
सामुदायिक यंत्रमाग प्रकल्पाचा प्रयोग. तरूणांना स्वयंरोजगारासाठी खूप मदत. सायकल रिपेअरी, शिलाई, वीज उपकरणे, घोगंडी उत्पादन ग्रामीण उद्योगांना सक्रीय प्रोत्साहन द्राक्षबाग, कोबडीपालन, शेळी पालन, रेशीम-उद्योग, तयार कपडे, हातमाग, चेरी इत्यादींचे प्रशिक्षण व उत्पादन.
कुक्कट पालन-
महिला सहकारी उपक्रम – ५०हजार पक्षी. सभोवतीच्या महिलांना या उद्योगासाठी सर्वतोपरी मदत पशुपक्षी खाद्य निर्मिती व पुरवठा
कुटुंबविकास-
बालकांच्या सर्वागीण विकासाकरिता प्रचंड परिश्रम आहार, शिक्षण, आरोग्य, संस्कार, व्यवहारज्ञान, क्रीडा या सर्व बाजूंवर लक्ष. एकावेळी तीनशे ते पाचशे मुलाच्या संख्येने एकूण साडेपाच हजार मुलांना मदत. कुटुंबातील सर्व घटकांना एकत्रित लाभ.
अन्य सेवा-
आरोग्य, क्रीडा, तंत्रज्ञान यांची शिबिरे, दंत, डोळे, कुटुब कल्याण, रक्तदान इ. शिबिरे. शेती प्रदर्शन व कृषिविद्यापीठांना शेतकर्यांच्या भेटी.ग्रामीण महिलांसाठी वैज्ञानिक प्रशिक्षण, पतंसंस्था भिशीमडंळे. बालवाडया, अंगणवाडया, विशेष प्रशिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, सांडपाण्याची गटर्स, पाण्याची टाकी, कूपनलिका अशा सोयी. नैसर्गिक आपत्तीत कार्यक्षेत्राबाहेर मदत.
जालीहाळ भागातील प्रकल्प
शेतीसुधारणा
कूपनलिका, पाईपलाईन, बियाणे यासाठी मदत देऊन छोटया शेतकर्यांचे स्थलांतर रोखण्याचे प्रयत्न. पाझर तलावातील पाणी वापरण्यासाठी पंपसेट व पाईप्स उपलब्ध करून दिले. स्र्पिंकलर, ठिबकसिचंन, ट्रॅक्टर ही साधने अत्यल्प नाममात्र खर्चात उपलब्ध. स्थानिक पिके व कमी पाण्यावर येणारी फळे यांची लागवड करण्यासाठी मार्गदर्शन, प्रोत्साहन व मदत,रोजगार हमीची स्वावलंबी योजना.
शिक्षण
शाळादुरूस्ती, साधने व सोयी यांसाठी तरतूद. समांतर शिक्षकाची नियुक्ती करून मुलांना जादा शिक्षण. शालेय शिक्षणसाहित्य वाटप. शिक्षकांच्या प्रशिक्षणाची सोय.
आरोग्य
महिलांच्या आरोग्याचे, अल्पवयीन विवाह समस्यांचे प्रश्न हाताळण्यासाठी प्रशिक्षित दायीची योजना. व्यसनमुक्तीसाठी सातत्याने प्रबोधन. मोठया शहरातील तज्ञ डॉक्टरांशी संपर्क ठेवून योग्य दरात सेवाभावी उपचाराची सोय. मुले, माता, यांच्यासाठी आरोग्यशिबिर, सार्वजनिक आरोग्य, सांडपाणी यांच्या सोयी करण्यासाठी मदत.
लोकजागृती –
सामाजिक प्रश्नांसंदर्भात पथनाट्ये, चर्चा, मेळावे, अनुदाने व कर्जे या मानसिकतेतून बाहेर येऊन स्वांवलंबनाचे निर्देश स्थानिक परिस्थिती, लोकसंस्कृती, निसर्ग यांची जपणूक व संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहन. महिला मंडळे, बचतगट यांतून आर्थिक गरज भागविण्याची सामुदायिक व्यवस्था.