बहुजन समाजाच्या आणि विशेषत: मराठा समाजाच्या समाजाच्या सर्वागीण उन्नतीसाठी झटणारी ही संस्था गेली पन्नास वर्षे सांगलीत समाज प्रबोधनाचे कार्य सेवाभावी वृत्तीने करीत आहे. सांगली एस.टी. स्टँडलगत, आंबेडकर रोडवर संस्थेचे कार्यालय, सभागृह व राजर्षि शाहू कॉम्प्युटर अॅकेडमी आहे.
संस्थेतर्फे खालील उपक्रम राबविले जातात.
१) स्पर्धा,व्याख्याने,परिसंवाद
२) कॉम्प्युटर प्रशिक्षण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम
३) वधुवर सुचक केंद्र, वधुवर मेळावे आणि विधवा-विधुर मेळावे.
४) नवरात्र, विजयादशमी, मकरसंक्रांत यासारखे सण
५) प्रजासत्ताक दिन, शिवजयंती, राजर्षि शाहू महाराज जयंती, स्वातंत्र्यदिन यासारखे महत्वाचे राष्ट्नीय दिवस,महात्मा फुले पुण्यतिथी.
६)वक्तृत्व स्पर्धा
७)सामाजिक प्रबोधनाचे विशेष प्रकल्प
अ)१३/१४ दिवस सुतक पाळण्याची परंपरा ३ ते ५ दिवसांएवढी मर्यादित करणे.
ब)विवाहापुर्वी लग्नपत्रिका व कुळ न बघता रक्त गटाची चाचणी करणे.
क)बाल विवाहास प्रतिबंध व्हावा म्हणून प्रबोधन
संस्थेचा सुवर्ण महोत्सव लवकरच होणार असल्याने आजीव सदस्य होऊन संस्थेच्या कार्यास हातभार लावावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड.दत्ताजीराव ब.माने व उपाध्यक्ष श्री.तानाजीराव मोरे यानी केले आहे.
संस्थेचा पत्ता:-
मराठा समाज,
डॉ. आंबेडकर रोड,सांगली ४१६४१६
दूरध्वनी-३७६९२०/३७७५४५