ब्रह्मनाळ(ता.पलूस) येथील कृष्णेच्या तीरावर असणारे रघुनाथ स्वामी व त्यांचे शिष्य आंनदमुर्ती यांची समाधी पंचक्रोशातील भाविकांची श्रध्दास्थाने आहेत
ब्रह्मनाळला कृष्णा आणि वेरळेचा संगम होतो.नदीकाठवरील झाडानी येथील वातावरण प्रसन्न होते.दरवर्षी कार्तिक महीन्यात आंनदमुर्ती व भाद्रपद व्दितीयेला रघुनाथ स्वामीच्या पुण्यतिथीचे येथे कार्यक्रम होतात.रमनवमीचा येथे मोठा उत्सव असतो.गावात मठ आहे. पाडव्यादिवशी मठातील सर्व देवांच्या मुर्ती वाजतगाजत समाधिस्थानी आणल्या जातात.या दिवसापासुन उत्सवाला सुरवात होते.रामनवमी हा उत्सवाचा मुख्य दिवस होय
एकादशीला मठातील मूर्ती पुन्हा वाजतगाजत आणल्या जातात.उत्सवाच्या काळात दररोज रूद्राभिषेक व अन्य धार्मिक विधी,र्कितन,प्रवचन आदी कार्यक्रम होतात.त्याकाळात दररोज महाप्रसाद असतो.रामनवमी उत्सव संपला कि लगेचच गावातील पिराच्या उरसास प्रारंभ होतो;या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होतात.यां शिवाय दर सोमवारी आणि शुक्रवारी नदीत परडया सोडण्यासाठी येथे परिसरतील भाविक येतात.