
सांगली अर्बन बँकेच्या निवडणूकीत आपल्या गटाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजय मिळवून देणारे श्री. बापूसाहेब पुजारी हे सांगलीकरांना सुपरिचित आहेतच. वयाच्या ७५ व्या वर्षी सुध्दा असलेला त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. बुध्दिमान, कल्पकता आणि संघटनकाशय या जोरावर बापूसाहेबांनी अलौकिक कामगिरी करून दाखविली आहे. ३४ वर्षे त्यांनी पत्रकारितेचा व्यवसाय केला. दै.तरूणभारतचे दक्षिण महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. यामुळे राजकीय क्षेत्रातील फार मोठा अनुभव गाठीशी बांधता आला. अन्याय व भष्ट्राचाराविरूध्द लेखन केले.
जिल्हा वार्तालाप हे सदर प्रथम सुरू करण्याचा मान त्यांना मिळाला. पत्रकारितेबरोबरच सहकारी चळवळींचे महत्व पटविल्याने या क्षेत्रातही अभ्यासपूर्ण कार्य केले. सांगली जिल्हा अर्बन बॅंक असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन बॅंक फेडरेशनचे संचालक व अध्यक्ष, तसेच नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बॅंक अँड क्रेडिट सोसा., नवी दिल्ली, या संस्थेचे संचालक अशा महत्वाच्या पदावर त्यांनी काम केले. सहकार भारती या संघटनेचे कार्याध्यक्ष झाल्यामुळे ते ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचू शकले व या अडचणी सोडवू शकले.
एक राज्यात नागरी सहकारी बँकेची एक शिखर बँक असावी यासाठी त्यांनी अटोकाट प्रयत्न केले. यासाठी मोठे अधिवेशन घेऊन एक शिखर बँकेचा प्रभावीपणे मांडला. परिणामत: रिझर्व बँकेकडून \’अपेक्स बॅंक \’ असे तिला प्रमाणपत्रही मिळविले. मधुकर देवल यांनी म्हैसाळ येथे सरू केले. तेथे गोरगरिबांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले जाते. अशा लोकांना स्वत:चा व्यवसाय निर्माण करून देणे, सरकारी कचेर्या , बँका यातील व्यवहार करण्यास शिकविणे या उद्देशाने ट्रस्ट स्थापन केला. बापूसाहेब सुरूवातीपासून या कामात सहभागी आहेत. तसेच गेली १०-१५ वर्षे याचे अध्यक्षही आहेत. बापूसाहेबं यांना पत्रकारिता, सहकारी चळवळीची आवड आहे. या प्रेरणेमुळे सांगलीत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ज्ञानेश्वरी पारायणे घडवून आणली जातात.