डॉ. गोविंद चिंतामण तथा बापूसाहेब करमरकर
`चिंतामणी \’ निवास, शाळा नं.१ जवळ,
ब्राम्हणपुरी, मिरज – ४१६ ४१०.
फोन : (०२३३) २२९५८७.
जन्म मिरज येथे दिनांक २३-१२-१९३२ रोजी.
लहानपणापासून घरात संगीतमय वातावरण. त्यामुळे संगिताची आवड. किशोरवयात पुरलेला, टांगता, वेताचा, दोरीचा, उसावरील, हत्यारी, बारा बाटल्यावरील निराधार मल्लखांबात पारंगत. मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, मुंबई, बडोदा, नागपूर, लखनौ, रत्नागिरी वगैरे ठिकाणांच्या सामन्यातून पहिला नंबर. अखिल महाराष्ट्र शारिरीक शिक्षण परिषदेच्या सामन्यातून सलग तीन वर्षे पहिला क्रमांक. विलींग्डन कॉलेजमध्ये असताना इंटर कॉलेजिएट स्पोर्टसमध्ये दोन्ही वर्षे मल्लखांबात चँपीयन. महाराष्ट्नचे माजी राज्यपाल हरेकृष्ण मेहता, न. वि. गाडगीळ, सी. डी. देशमुख, डॉ. राधाकृष्णन्, विनोबा भावे यांचेसमोर प्रात्यक्षिके. त्याचप्रमाणे महाराष्ट्नीय मंडख पुणे, इंदौर, लखनौ, भोपाळ, चंदीगड येथे मल्लखांब प्रात्यक्षिके. तसेच दिल्ली येथे डॉ. राजेंद्र प्रसाद यांचेसमोर राष्ट्न्पती भवनात श्री. अंबाबाई तालीम संस्थेच्या दौर्या चे माध्यमातून मल्लखांबाची प्रात्यक्षिके व त्याबद्दल वाहव्वा.
सातारचे पं. केशवबुवा मटंगे (इंदिराबाई खाडिलकर यांचे गुरू) यांचा २-३ वर्षे सहवास. ग्वाल्हेर घराण्याचे गाईकीतील प्रचलीत रागांचे ख्याल, चिजा, कांही तराणे यांची तोंड ओळख. मिरज मिशन हॉस्पिटलमध्ये दोन वर्षे एन्ट्न्नशिप, मिरज व आसपासच्या भागात वैद्यकीय व्यवसाय.
मिरजेतील पं. पेटकरबुवा यांचेकडून ३-४ वर्षे गायनास मार्गदर्शन. पं. भानुदासबुवा गुरव यांचेकडून लय, ताल, कांही ठेके, कायदे यांची माहिती. पं. भानुदासबुवा स्मृति महोत्सव समितीचे अध्यक्षपदाची जबाबदारी. गेली १०-१२ वर्षे मिरजेतील श्री. अंबाबाई संगीत नवरात्रोत्सवाचे मंडळाचे अध्यक्षपद, उस्ताद गणपतराव कवठेकर यांचे स्मृति सोहळा समितीचे उपाध्यक्षपद तसेच खाँ अब्दुल करीम खाँ स्मारक भवन, ऊमरसाहेब सतारमेकर, आबासाहेब सतारमेकर स्मृति सोहळा इत्यादी संगीत कार्यक्रमास सहकार्य. या सहभागामुळे संगीत क्षेत्रातील कलाकारांचा व येथे काम करणार्या लोकांचा सहवास. श्री. अंबाबाई तालीम संस्थेच्या सल्लागार समितीवर नियुक्ती.