
(१९१४-२००१)
यांचा जन्म १७ मे १९१४ रोजी सांगलीजवळील समडोळी येथे झाला. यांनी जैन महिलांच्या शिक्षणासाठी बरेच प्रयत्न केले. जैन महिलाश्रम चालू केले. त्यांनी मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम केले आहे. नेमगोंडा पाटील व राजमतीबाई यांनी आपली सर्व मालमत्ता लठ्ठे पॉलिटेक्निकला दान म्हणून देऊन टाकली. त्यांचा श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट आहे. त्यांना ‘सांगलीभूषण’ किताब मिळाला.