कुंडल गावाच्या पश्चिमेकडील डोंगराचरील श्री वीरभद्र देवस्थान आहे.हे लिगायत समाजाचे देवस्थान आहे. डोंगरावर असलेली बहामनी कालीन लेणी(गुहा)वैशिष्टपूर्ण आहेत.गावाच्या पश्चिमेस असलेला श्री वीरभद्र डोंगर पर्वताच्या रांगाचे शेवटचे टोक आहे. श्री वीरभद्र देवस्थान जमिनीच्या सपाटीपासून ३०० फूट उंचीवर आहे.मूर्ती तीन फूट उंचीची आहे.
प्रतीवर्षी कार्तिक आमावस्येला येथे यात्रा भरते. श्री वीरभद्रदेवीचा विवाह सोहळा विविध कार्यक्र्मांनी होतो.यासाठी महाराष्ट्रातून,कर्नाटकातून मोठया प्रमाणात भाविक येतात.यासाठी बाजरीची भाकरी व हिरव्या मिरचीचा ठेचा असा प्रसाद असतो. डोंगरावर वीज,पाणी निवासाची सोय आहे.