करगणीचे लखमेश्वर

दक्षिण भारतात शंकराची प्रत्यक्ष आत्मलिंगे असलेली तीन तीर्थ क्षेत्रे आहेत.त्यापैकी एक आटपाडी तालुक्यातील करगणी येथील लखमेश्वर (श्रीराम मंदिर) होय.

हा परिसर म्हणजे रामाणयातील दंडकारण्याचा भाग होय.मंदिराच्या आत व बाहेर अप्रतिम कलाकुसर आहे.सुदंर मोर, कृष्णावातारातील शिल्पे,वाद्ये वाजविणारा कलाकार समुद्रगुप्त व इतर नक्षीकाम सुदंर कोरलेले आहे.

येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवसा पासून भव्य यात्रा भरते.पहिल्या दिवशी पारण्याचा कार्येक्रम होतो.पहिले दोन दिवस शेळ्या-मेढयांची यात्रा भरते.नंतरचे आठ दिवस माणदेशी खिलार जनावराची यात्रा भरते. सर्पूण यात्रेत कोटी रूपयावर उलाढाल असते.यात्रेत सांगली,कोल्हापूर,सातारा कर्नाट भागातून जनावरे दाखल होतात. हा सारा परिसर खिलार जनांवरानी फुलून जातो.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »