सप्रेम नमस्कार,
सतरा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या मराठी वेबसाईटमध्ये अनेक स्थित्यंतरे घडली. सर्व्हर व टेक्नॉलॉजी बदलात पूर्वी असणारी बरीचशी माहिती या नव्या वेबसाईटमध्ये आलेली नाही. सांगलीतील विविध संस्था व व्यक्ती यांचा परिचय फारच त्रोटक आहे. आता ही वेबसाईट पुन्हा सर्वंकष व माहितीपूर्ण करण्याचे ज्ञानदीपने ठरविले आहे.

आपण आपल्या परिचयातील व्यक्ती, संस्था व सांगलीविषयी इतर माहिती ज्ञानदीपकडे पाठविल्यास त्याचा या वेबसाईटवर समावेश करण्यात येईल. सांगलीला पुन्हा कला व उद्योगनगरी बनविण्यासाठी त्यांचे आदर्श जनतेपुढे येण्याची गरज आहे.

मी डॉ. सु. वि. रानडे गेली चार वर्षे अमेरिकेत वास्तव्यास असल्याने आपणा सर्वांची प्रत्यक्ष भेट घेऊ शकत नाही यासाठी आपण ज्ञानदीपच्या विजयनगरमधील ऑफिसशी संपर्क साधावा ही विनंती.
आपल्या सहकार्याबद्दल आभार.
आपला
सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली
संपर्क – +919422410520

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या संकेतस्थळाचे नाव http://www.smkc.gov.in हे आहे. त्यावर महानगरपालिकेच्या विविध विभागांद्वारे केल्या जाणार्‍या कार्याची माहिती दिली आहे. याशिवाय काही माहिती डाऊनलोड करण्यासाठीही ठेवली आहे.
सांगली जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळाचे नाव http://www.sangli.gov.in हे आहे. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय विभाग, जनसंपर्क, जिल्हा व तालुक्यांचे नकाशे,जिल्हा नियोजन समिती, शासकीय निविदा, तलाठी परीक्षा गुणवत्ता यादी, अनुकंपा उमेदवारांची यादी इत्यादी बरीच माहिती आहे. याशिवाय सांगलीचा इतिहास, सांगलीतील प्रसिद्ध व्यक्ती, पर्यटनस्थळे याबाबत माहिती आहे.
सांगली जिल्हा परिषदेच्य़ा संकेतस्थळाचे नाव http://www.zpsangli.in हे आहे. त्यावर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांद्वारे केल्या जाणार्‍या कार्याची माहिती दिली आहे. याशिवाय काही माहिती डाऊनलोड करण्यासाठीही ठेवली आहे. जसे माहितीचा अधिकार, जिल्हा परिषद सदस्य यादी इत्यादि.
Translate »