मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन पूर्वीची नाट्यसंमेलने ६९वे नाट्यसंमेलन भाग ७ - डॉ. मधू आपटे
६९वे नाट्यसंमेलन भाग ७ - डॉ. मधू आपटे पीडीएफ प्रिंट ई-मेल
' झुंज एका वाऱ्याशी' ह्या पु.ल. देशपांडे लिखित नाटकाचे लागोपाठ दोन प्रयोग भावे नाट्य मंदिरात करण्यात आले, असे नाट्य संमेलनात प्रथमच घडले. या नाटकात दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत होते आणि ह्या राजकीय नाटकाचे दिग्दर्शक होते श्री वामन केंद्रे. ते दिल्लीच्या "राष्ट्रीय नाट्य संस्थे'चे विद्यार्थी आहेत. या नाटकाबद्दल एक गंमतीदार आठवण आहे. या नाटकाच्या प्रयोगाबद्दल मी पु.ल. देशपांडे यांच्याशी बोललो आणि परवानगी मागितली, तेंव्हा ते खो खो हसले आणि म्हणाले " अरे नाट्य संमेलनात असली नाटके करायची नसतात. प्रेक्षकांना काही वेगळे हवे असते. मी म्हणालो ' अशी नाटके आमच्या सांगली सारख्या भागात कधीच होत नाहीत. आणि सांगली संमेलना निमित्त अशी नाटके दाखवण्याचे आम्ही जाणीव पूर्वक ठरवले आहे. शेवटी पु. ल. म्हणाले ' नाट्य पंढरी सारख्या ठिकांणी माझी जिरवण्याचा तुम्ही विडा उचलाय काय ? मी म्हणालो ' नाही . उलट पु. ल. नेहमीपेक्षा वेगळे देऊ शकतात हे आम्हाला दाखवायची संधी मिळेल , तेंव्हा लागोपाठ दोन प्रयोग करायचे ठरवत आहोत ह्या नाटकाचे !!!! "...दोन प्रयोग ?'...... आता पु. ल. उडाले . माझा अति आग्रह पाहून ते म्हणले, छान, मला सांगलीत तोंड दाखवायला जागा ठेवायची नाही असे तुम्ही ठरवले दिसते. करा, करा ... पण नंतर काय झाले ते गुपचूप कळवा. मला आताच काळोख दिसायला लागलाय.''...... आणि एक झुंज वाऱ्याशी ह्या नाटकाचे लागोपाठ दोन प्रयोग भावे नाट्य मंदिरात झाले आणि एक वेगळाच इतिहास घडला .... पुढे पु. ल ना हे कळले तेंव्हा फोनवर म्हणाले " छे . पेक्षकांना काय आवडेल याचा अंदाज कुणालाच बांधता येत नाही हे एकमेव सत्य !'