मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन पूर्वीची नाट्यसंमेलने ६९वे नाट्यसंमेलन भाग ६ - डॉ. मधू आपटे
६९वे नाट्यसंमेलन भाग ६ - डॉ. मधू आपटे पीडीएफ प्रिंट ई-मेल
नाट्य संमेलनाचे वैशिष्ठ्य

नाट्य संमेलनाची सुरुवात प्रथेप्रमाणे ‘ विष्णुदास भावे गौरव गीत ' गायनाने झाली ... कवी श्री राम चिपळूणकर यांनी खास संमेलनासाठी लिहिलेल्या या गीताला श्री मधु लिमये यांनी चाल लावली आणि रवी कुलकर्णी, विजय कुलकर्णी , हृषिकेश बोडस, मंगला जोशी, मंजुश्री कुलकर्णी आदी गायकांनी हे गीत अतिशय प्रभावीपणे गायले. आज इथल्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ' नांदी'च्या आधी ‘ विष्णुदासा आळवू मनोभावे ' ह्याच गीत गायनाने होते

कवी कुसुमाग्रज उर्फ वि,वा शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले होते त्या निमित्त त्यांचा वांङमयावर आधारित ' कुसुमाग्रज गौरवांजली' हा खास कार्यक्रम करण्यात आला. याशिवाय ' शब्द ' ह्या विषयाला प्राधान्य देणारा ' शब्द ब्रह्म ' हा अगदी आगळा वेगळा कार्यक्रम आखला. त्या डॉ. अशोक रानडे, विद्याधर गोखले याची भाषणे, डॉ. दीपा कार्लेकर [ बेळगाव] यांचे 'बालगंधर्वांची गायकी; हे प्रमुख कार्यक्रम गाजले.

या सर्वावर ताण म्हणजे ह्या नाट्य संमेलनात प्रथमच मराठी बरोबर गुर्जर आणि कन्नड रंगभूमी ची खास दखल घेतली आणि मराठी [ पेडगावचे शहाणे ] गुजराथी [ आमंत्रणं ] आणि कन्नड [ दिंडी] अशी नाटके सादर केली शिवाय गुजराथी रंगभूमीवर मराठी नाटके सादर करणारे श्री. अनिल मेहता आणि कन्नड रंगभूमीवरील कलाकारांचा भव्य सत्कार करून रंगभूमीवर भाषा भगिनी एकत्र आणण्याची सुरुवात करण्याचा मान ' नाट्य पंढरी सांगलीने च ' मिळवला. मराठी भाषेला विष्णुदासांनी जे नाटक दिले त्याच स्रोत कर्नाटक होता आणि व्यापारधंद्यानिमित्त आलेले गुर्जर, मारवाडी सांगलीत मोठ्या संख्येने आहेत हे लक्षात घेवून असा ' त्रि भाषिक' प्रयोग सांगली नाट्य संमेलनाने केली शिवाय आम्ही सांगलीकर हा भरगच्च कार्यक्रम लक्षवेधी ठरला. तसेच प्रा. गंगाधर गाडगीळ यांचे ' नाट्य व्यवसायाचे अर्थकारण ' हे अभ्यासपूर्ण भाषण त्यावेळच्या नाटकव्यवसायाला मार्गदर्शन करणारे होते. समारोप प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या विलक्षण रसाळ भाषणाने झाला.

नाटय संमेलनाचे अध्यक्ष श्री राजाराम शिंदे हे तर व्यावसायिक नाट्य निर्माते, त्यामुळे त्यांनीही अनुभवाचे बोल ऐकवत नाटय व्यवसायाला महत्वाचे मार्गदशन केले. याशिवाय नाट्य परिषद सदस्यांची ' विशेष सर्वसाधारण सभा ' स्वतंत्रपणे आणि घटनेच्या नियमानुसार सांगली नाट्य संमेलनातच प्रथम आग्रहाने आयोजित केली त्याला मोठ्या संखेने उपस्थित राहून सदस्यांनी प्रथमच ' हक्क ' गाजवला ...... एकूण नाट्य संमेलन म्हणजे परिषदेचे वार्षिक अधिवेशन असते हे सांगली नाट्य संमेलनाने दाखवून दिले

६९ वा व्या सांगली नाट्य संमेलनात अनेक सुंदर कार्यक्रम झाले. त्यापैकी एक म्हणजे बेळगावच्या डॉ. सौ. दीपा कार्लेकर यांचा ' बाल गंधर्वांची गायकी ' हा सप्रयोग संगीत कार्यक्रम ! नटसम्राट बालगंधर्वांच्या अपूर्व गायकीचा शास्त्रोक्त शोध घेण्याचा हा प्रयत्न होता, स्वतः डॉ,कार्लेकर उत्तम गायिका तर आहेतच, पण त्यांचे पिताजी हे संगीतातील त्यांचे गुरु तर उत्तम विश्लेषक आहेत, त्यामुळे डॉ. कार्लेकर यांनी सुरेल आवाजात गात, बाल गंधर्वाच्या गाण्याचे जे विश्लेषण उलगडून दाखवले, त्यामुळे हा कार्यक्रम रसिकांना फार आवडला. असाच दुसरा कार्यक्रम म्हणजे संगीत नाटककार श्री विद्याधर गोखले यांचे ‘ शब्द ब्रह्म' हा संमेलनाचा मुख्य विषय असलेले व्याख्यान, नाटकातील शब्द, त्यातल्या पद्यांचे शब्द, गद्य भाषणातील शब्द .. असे व्याख्यान म्हणजे एक अति दुर्मिळ योग होता