मुख्य विभाग

स्वागतकक्ष नाट्यसंमेलन पूर्वीची नाट्यसंमेलने ६९वे नाट्यसंमेलन भाग ३ - डॉ. मधू आपटे
६९वे नाट्यसंमेलन भाग ३ - डॉ. मधू आपटे पीडीएफ प्रिंट ई-मेल
६९वा व्या सांगली नाट्य संमेलनाचे कार्यालय भावे नाट्य मंदिर च्या आवारातील नुकत्याच बांधलेल्या पूर्व पश्चिम इमारतीत नेण्यात आले. तिथे एक पाटी लावली, त्यावर ' नाट्य संमेलन आजपासून ' ....' इतक्या दिवसांवर आहे ' थोडक्यात कॅलेंडर उलटे लावले, त्यामुळे किती कामे करायची आहेत आणि त्या साठी किती अवधी उरला आहे हे सर्वांच्या सतत नजरे समोर राहत आले, महत्वाचा निर्णय घ्यायचा होता तो म्हणजे संमेलनाच्या जागेचा! एकूण डोळ्यासमोर जो आवाका ठेवला होता, त्यासाठी भावे नाट्य मंदिराचे आवार कमी पडणार होते, वास्तविक १९४३ मधील नाट्य शताब्दी महोत्सव आणि ३३ वे मराठी नाट्य संमेलन. त्याला जोडून साहित्य आणि [ मला वाटते] ज्योतिष संमेलन असा भरगच्च कार्यक्रम याच आवारात झाला होता. त्यावेळी स्वातंत्रवीर वि.द. सावरकर नाट्यशताब्दी संमेलनाचे अध्यक्ष आणि ना.वि. कुलकर्णी हे नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. त्यामुळे या जागेबद्दल रसिकांच्या मनात एक खोल नाजूक भावना घर करून होती. त्याचा पूर्ण आदर करून १९४३ नंतर ४५ वर्षांनी भरणाऱ्या संमेलनाचा आवाका लक्षात घेवून सांगलीच्या किल्ल्यातील [ राजवाडा ] हिंदू सघटन मैदानाची निवड करण्यात आली आणि शेजारचे कन्या पुरोहित प्रशाला आणि आठवले विनय मंदिर यांचे प्रांगण असा विशाल परिसर या संमेलनास मिळाला