मुख्य विभाग

स्वागतकक्ष सांगली जिल्हा सांगली जिल्हा कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प
कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प पीडीएफ प्रिंट ई-मेल

कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाच्या रु. ८२.४३ कोटी खर्चाच्या मूळ प्रकल्प अहवालास शासन निर्णय क्र. केकेएलआय १०८४/१०३(२१/८४) जसंअ(१) दि. २६/०४/८४ अन्वये प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली . सदर अहवालानुसार सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगांव व मिरज या दुष्काळी तालुक्यातील सुमारे ३६६१५ हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे प्रस्तावित होते. या प्रकल्पात फक्त ताकारी योजनेचाच समावेश होता.

उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर लवकर होण्याचे दृष्टीने तसेच जास्तीत जास्त दुष्काळी क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे दृष्टीने ताकारी योजनेबरोबरच म्हैसाळ योजनेचा समावेश असलेल्या रु. १८७.९० कोटी खर्चाच्या प्रकल्प अहवालास शासन निर्णय क्र. कोकृपा १०८५/५६३(१३५/८५) जसंअ दि. २७/०३/८६ अन्वये सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. सदर अहवालानुसार सांगली जिल्ह्यातील खानापूर , तासगांव , मिरज व कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यातील सुमारे ६८९०८ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे प्रस्तावित होते.

ताकारी योजनेमध्ये चिंचणी अंबक प्रस्तावाद्वारे भिजणारे १३२७ हेक्टर क्षेत्र, सोनहिरा नाल्याच्या डाव्या तीरावरील २४४४ हेक्टर क्षेत्र व म्हैसाळ योजनेमध्ये खंडेराजुरी शाखा कालव्याच्या विस्तारीकरणामुळे भिजणारे ७९१ हेक्टर क्षेत्र तसेच म्हैसाळ टप्पा ६ नुसार जत, सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील ३२५५० हेक्टर क्षेत्र यांचा समावेश करुन सादर करण्यात आलेल्या रु. १३२१.१२ कोटी खर्चाच्या प्रकल्प अहवालास महामंडळाच्या निर्णय क्र. कृकोउसिंप्र/द्वितीय सुधारित/प्रशा-२/(२९६)/(३०५/९६)दि.०७/०५/१९९७ अन्वये द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. सदर अहवालानुसार सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगांव , मिरज, कवठेमहांकाळ व जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यातील एकूण १०६०२० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे प्रस्तावित होते.

लोकप्रतिनिधी व लाभार्थीच्या मागणीनुसार म्हैसाळ योजनेमध्ये विविध उपसा सिंचन योजना व अग्रणी नदीवरील को.प.बंधारे तसेच ताकारी योजनेमध्ये येरळा नदीवरील को.प.बंधा-यांचा समावेश करुन तयार करण्यात आलेल्या रु. १९८२.८१ कोटी खर्चाच्या प्रकल्प अहवालास महामंडळाच्या निर्णय क्र. मकृखोविमं/(२०१)/(४८८/२००१)/सुप्रमा/मप्र- ६/७२० दिनांक २२/०१/२००४ अन्वये तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. या अहवालानुसार सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगांव, खानापूर, तासगांव, मिरज, जत व कवठेमहांकाळ तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील सुमारे १०९१२७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे.

Ref-http://sekklipc.org/project_information.php