मुख्य विभाग

कासेगाव शिक्षणसंस्था पीडीएफ प्रिंट ई-मेल
राजारामबापू पाटील यांनी स्थापन केलेल्या कासेगाव शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच अभियांत्रिकी, शेती, संगणक, तंत्रशिक्षणाची सोय झाली आहे. संस्थेची स्थापना १६४५ मध्ये कासेगाव येथील हरिभाऊ रामंचंद्र देशपांडे यांच्या वाडयात झाली आहे. संस्थेचे पहिले अध्यक्ष जगालाल लांलचंद दोशी होते. १९५२ ला लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सर्वोदय वसतिगृह सुरू केले आता एक अद्ययावत शिक्षणसंस्था म्हणून जंयत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या ३ बालवाडया ४ प्राथमिक शाळा,२७ माध्यमिक विद्यालये, ३ वरिष्ठ महाविद्यालयांसह अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, फार्मसी, नर्सिग, व्यवस्थापनशास्त्र, कृषी,संगण्क, आयटीआय असा एकूण ६१ विद्यालायांमध्ये शाखाविस्तार झाला आहे.या विद्यालयांमेध्ये सुमारे २६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.