मुख्य विभाग

स्वागतकक्ष संस्था परिचय शिक्षणसंस्था डेक्क्न एज्युकेशन सोसायटी
डेक्क्न एज्युकेशन सोसायटी पीडीएफ प्रिंट ई-मेल
उच्चशिक्षणाची सोय सांगलीत प्रथम विलिंग्डन महाविद्यालयाच्या रूपाने झाली. प्राचार्य गोकाक, पु.ल.देशपांडे, प्रा. म.द.हातकंणगलेकर यांचा उल्लेख ओघानेच विलिंग्डनबरोबर येतो. कला आणि विज्ञान शाखेची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा असलेल्या या महाविद्यालयाची इमारत आणि परिसर सांगलीचा वास्तुवारस सांगणारा आहे. शेजारीच १९६० मध्ये स्थापन झालेले चितांमणराव व्यापार महाविद्यालय आहे. दक्षिण महाराष्ट्रात वाणिज्य शिक्षण शाखेची सुरवात यापासूनच झाली. या दोन्ही महाविद्यालयांचा सव्वाशे एकरांचा परिसर सांगलीचे अधिपती चिंतामणराव पटवर्धन यांनी दान स्वरूपात दिला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आता सांगलीत ’इन्स्टिटयूट’ ऑफ मॉनेजमेंट अ‍ॅड रिसर्च आणि ’इन्स्टिटयूट’ऑफ रिसर्च अ‍ॅड डेव्हलपमेंट इन ’अ‍ॅग्रिकल्चर’ या दोन महाविद्यालयांची स्थापना केली. बिझनेस इंडियाने व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयाला ’अ’श्रेणी दिली आहे. एमबीए, डीबीएम, बीसीए या पदवी अभ्यासक्र्मांबरोबरच डिप्लोमा इन इंटरनॅशनल ट्रेड, डिप्लोमा इन सॉफ्ट स्किल्स, डिप्लोमा इन सॉफ्टवेअर मॅनेजमेंट असे पदविका अभ्यासक्रमही येथे शिकविले जातात.